आरोग्यताज्या बातम्यासामाजिक

पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्काराचे ध्येय ठेवावे – मदनसिंह मोहिते पाटील

रूद्रा डेंटल क्लिनिकचे उद्घाटन थाटात संपन्न

अकलुज (बारामती झटका)

सध्याच्या काळात आदर्श समाज घडविण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देवुन आदर्श संस्काराचे ध्येय ठेवले तरच त्यांचे आणि समाजाचे भविष्य उज्वल होईल. त्यामुळे पालकांनी मुलांचे शिक्षण आणि आदर्श संस्काराचे ध्येय ठेवावे, असे मत अकलुज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

अकलुज येथे डॉ. सावन पालवे यांच्या रूद्रा डेंटल क्लिनिकचे उद्घाटन मदनसिंह मोहिते पाटील यांचे हस्ते व प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ. ‌एम. के. इनामदार, डॉ. निलेश फडे, डॉ. संतोष खडतरे, डॉ. किरण फडे, डॉ. संजय सिद, डॉ. ए. बी. आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

महादेव अंधारे, महर्षि प्रशालेचे मुख्याध्यापक संजय गळीतकर, डॉ. प्रा. दत्तात्रय मगर, श्रीपुर – महाळूंगचे नगर सेवक प्रकाश नवगिरे, विक्रमसिंह लाटे, मौला पठाण, दादासाहेब लाटे, पत्रकार बंधु व असंंख्य बालमित्र-मैत्रीणी, पत्रकार मित्र, आरोग्य सेवक-सेविका, व्यापारी बंधू यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मदनसिंह मोहिते पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

पुढे बोलताना मोहिते पाटील यांनी शिक्षणाचे महत्व सांगत शिक्षणामुळे जिवन आनंदी होते, असे सांगितले. तसेच आई-वडीलांना मुलांच्या भविष्याची काळजी असते. आपला मुलगा किंवा मुलगी उच्च शिक्षित होवुन समाजात आदर्श नागरीक म्हणून ओळखला जावा, ही त्यांची धडपड पाहुन मुलांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रीत करुन यशस्वी नागरिक बनण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार कृष्णा लावंड, अजिनाथ आंधळे, प्रविण सावंत, अविनाश गायकवाड, आकाश मोरे, केतन लोखंडे यांनी परीश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार नागेश लोंढे यांनी केले तर आभार शिवाजी पालवे यांनी मानले.

कठोर परिश्रमास पर्याय नाही – डॉ. एम. के. इनामदार
समाज निरोगी आणि दिर्घायु करण्यासाठी डॉक्टर प्रामाणिक प्रयत्न करीत असतात. निरोगी समाजासाठी डॉक्टरांचे महत्वाचे योगदान असते. भविष्यात नवीन डॉक्टर निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांनी कष्ट करण्याची गरज आहे, कारण आयुष्यात कठोर परिश्रमास पर्याय नाही.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button