ताज्या बातम्याशैक्षणिक

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवणारी बारावी परीक्षेस सुरुवात…

माळशिरस तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा – लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते..

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस पंचायत समिती गटशिक्षण विभाग अंतर्गत तालुक्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा शुभारंभ होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडवणारी बारावी परीक्षेस आजपासून सुरुवात होत आहे. सर्व विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांचेकडून हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

माळशिरस तालुक्यात बारावी परीक्षेसाठी 15 परीक्षा केंद्रावर 6197 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. आज परीक्षेचा पहिला पेपर सुरू झालेला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले आहे.

खऱ्या अर्थाने दहावी व बारावी बोर्डाची परीक्षा भविष्य उज्वल घडवणारी परीक्षा असते. यामधून मुले आपले करिअर घडवत असतात‌. पहिला टप्पा दहावीचा पूर्ण केल्यानंतर बारावीचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कायमच कटिबद्ध राहून ग्रामीण भागातील तालुक्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी कायम प्रयत्न केला जाणार आहे.

परीक्षेसाठी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते व बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनेल संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपली शिक्षणामधील मनोकामना पूर्ण होवो, हीच विद्येची देवता सरस्वती मातेकडे प्रार्थना.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button