चि. सौ. कां. कल्याणी वाघ-पवार व चि. जय फडतरे-देशमुख यांचा शाही शुभ विवाह सोहळा संपन्न होणार…

श्री. किसनराव गोपाळराव वाघ – पवार
माजी संचालक, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लि. शंकरनगर
श्री. सज्जन भागवत वाघ – पवार
माजी चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सोसायटी लवंग, ता.माळशिरस
लवंग (बारामती झटका)
स्वर्गीय भागवत मारुती वाघ – पवार यांची नात व सौ. सविता व श्री. अंकुश भागवत वाघ – पवार रा. लवंग, ता. माळशिरस, यांची ज्येष्ठ कन्या चि. सौ. कां. कल्याणी वाघ – पवार आणि स्व. साहेबराव बाजीराव फडतरे – देशमुख यांचे नातू व सौ. उज्वला व श्री. उत्तम साहेबराव फडतरे – देशमुख रा. कळंब – वालचंदनगर, ता. इंदापूर, यांचा सोमवार दि. 17/02/2025 रोजी सायंकाळी 06 वाजून 29 मिनिटे या गोरज मुहूर्तावर फडतरे नाॅलेज सिटी, कळंब – वालचंदनगर, ता. इंदापूर, जि. पुणे, येथे शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री. किसनराव गोपाळराव वाघ – पवार व लवंग विविध कार्यकारी सोसायटी लवंग चे माजी चेअरमन श्री. सज्जन भागवत वाघ – पवार आणि समस्त वाघ – पवार, लवंग यांच्या वतीने लग्न समारंभास उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

पारिजातकाच्या वर्षावाप्रमाणे अक्षदांची उधळण आणि स्नेहमय आशीर्वादाची बरसात व्हावी यासाठी वाघ – पवार परिवारातर्फे आग्रहाचे निमंत्रण आहे. असे आपले नम्र गं. भा. भामाबाई भागवत वाघ – पवार, सौ. उषा व श्री. सज्जन भागवत वाघ – पवार, सौ. सविता व श्री. अंकुश भागवत वाघ पवार, सौ. अनुजा व श्री. अर्जुन भागवत वाघ – पवार यांच्या विनंतीस मान देऊन शुभकार्यास अगत्य यावे.
लग्नाच्या घाईगडबडीत आपणांस हस्ते परहस्ते आमंत्रण अथवा निमंत्रण न मिळाल्यास हेच आमंत्रण समजून शाही शुभविवाह सोहळ्यास उपस्थित राहावे, असे वाघ – पवार व फडतरे – देशमुख दोन्हीही परिवारांच्या वतीने मित्र परिवार व नातेवाईक यांना नम्र विनंती करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.