महसूल प्रशासन उघडा डोळे बघा नीट, बोअरवेल खोदल्या गेल्या दोनशे फुटाच्या खोल….

धनदांडग्या शेतकऱ्यांकडून अल्पभूधारक व गोरगरीब शेतकऱ्यांवर महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने अन्याय सुरू आहे..
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने धनदांडग्या शेतकऱ्यांकडून गोरगरीब व अल्पभूधारक शेतकऱ्यांवर अन्याय सुरू आहे. महसूल प्रशासनाचे आर्थिक हितसंबंध असल्याने बोअरवेल शासन नियमाच्या पुढे जाऊन खोदल्या जात आहेत. यासाठी महसूल प्रशासन उघडा डोळे बघा नीट, बोअरवल खोदल्या गेल्या दोनशे फुटाच्या खोल, अशी अल्पभूधारक व गोरगरीब शेतकऱ्यांमधून चर्चा सुरू आहे.
माळशिरस तालुक्यात बोअरवेल गाड्यांची झुंडच्या झुंड येत आहे. एजंटांचा सुळसुळाट झालेला आहे. महसूल प्रशासनातील तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्याशी एजंट यांचे खाजगी व अर्थपूर्ण संबंध असल्याने तालुक्यात बोअरवेल उदंड झाले, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. जमिनीमधील भूगर्भात पाणीसाठा योग्य प्रमाणात राहावा यासाठी शासनाचा दोनशे फुटाच्या खाली बोअरवेल खोदावयाचे नाही, असा नियम असताना नियम धाब्यावर बसवून 200 फुटाच्या खोल बोअरवेल सुरू आहे. त्यामुळे सर्वसामान्य व अल्पभूधारक शेतकऱ्यांनी 200 फुटापर्यंत घेतलेले बोअरवेल व विहिरीचे पाणी जास्त खोल घेतलेल्या बोअरला जात आहे. त्यामुळे धनदांडग्या शेतकऱ्यांकडून अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांवर अन्याय महसूल विभागाच्या एजंटांच्या माध्यमातून सुरू आहे. याच्यावर पायबंद बसण्याकरता प्रांत कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी लक्ष द्यावे, अशी अल्पभूधारक व सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.