ZRUCC सदस्यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना निवेदन सादर केले

चंद्रपूर (बारामती झटका)
ज्येष्ठ ZRUCC म्हणजे क्षेत्रीय रेल उपयोगकर्ता परामर्शदात्री समिती सदस्य दामोदर मंत्री यांच्या नेतृत्वाखाली ZRUCC सदस्य आणि NRUCC रेल्वे मंत्रालयाचे माजी सदस्य अजय दुबे आणि ZRUCC सदस्य प्रशांत विघ्नेश्वर यांनी बल्लारशाह/चंद्रपूर रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले मध्य रेल्वे मुंबई महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांची भेट घेतली आणि निवेदन सादर केले. बल्लारशाह कुर्ला एलटीटी ट्रेन उन्हाळ्यात तीन दिवस/रोज चालवणे, काझीपेठ पुणे ट्रेन आठवड्यातून तीन दिवस चालवणे, बल्लारशाह कुर्ला एलटीटी ट्रेनचा थांबा, शेगाव येथे बल्लारशाहची पिट लाइन सुरू करणे, अमृत भारत स्टेशन योजना लवकर पूर्ण करणे आदी मागण्यांचा समावेश होता.
महाव्यवस्थापकांनी सर्व प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद देताना सांगितले की, बल्लारशाह कुर्ला दैनिक आणि काझीपेठ पुणे तीन दिवस करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आला आहे.

या वेळी शेख करीम, सूरजसिंग ठाकूर, इंद्रजितसिंग आदी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.