ताज्या बातम्याराजकारण

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. जयकुमार गोरे यांचा हेलिकॉप्टरने सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुका दौरा जाहीर…

माढा लोकसभेचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते दौऱ्यात सहभागी राहणार आहेत..

नातेपुते (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. जयकुमार भगवानराव गोरे उर्फ जयाभाऊ यांचा सोलापूर जिल्ह्यासह माळशिरस तालुक्याचा हेलिकॉप्टरने दौरा रविवार दि. 16 फेब्रुवारी 2025 रोजी दौरा जाहीर झालेला आहे. त्यांच्या समवेत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते दौऱ्यात सहभागी आहेत.

कोल्हापूर येथून विमानतळावरून दुपारी 03.00 वाजता हेलिकॉप्टरने रवाना होवून माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे ३.४० वा. आगमन होणार आहे. शासकीय वाहनाने बोराटे वस्ती येथे श्रीकृष्ण मंदिर सभामंडप भूमिपूजन सोहळा व सत्कार समारंभ कार्यक्रम आटोपून हॉटेल जयनीला प्युअर व्हेज पुणे-पंढरपूर हायवे मोरोची, नातेपुते येथील उद्घाटन समारंभ आटोपून हॉटेल राधाकृष्ण फॅमिली रेस्टॉरंट पुणे-पंढरपूर बायपास रोड, नातेपुते येथील उद्घाटन करून नातेपुते येथून हेलिकॉप्टरने करमाळा जि. सोलापूरकडे प्रयाण करणार आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button