शिवराज व युवराज जोडगोळीने जलसंधारण कामांची वाट लावली, पाण्यापेक्षा जास्त पैसाच मुरला…

माळशिरस तालुक्यातील जलसंधारण कामे होऊनसुद्धा शेतकऱ्यांना काहीच फायदा नाही उन्हाळ्याच्या झळा कायम…
माळशिरस (बारामती झटका)
केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांची पाण्याची अडचण असल्याने जलसंधारण विभागामार्फत माळशिरस तालुक्यात जलसंधारणाची ओढा खोलीकरण, सरळीकरण, नालाबांध, सिमेंट बंधारे, अशी कामे मंजूर करून कोट्यावधी रुपये शासनाने खर्च केलेले आहेत. सदरची कामे अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे न होता निकृष्ट दर्जाची करून फक्त घोडीला घोडा लावण्याचे काम माळशिरस तालुक्यात जलसंधारण कामांमध्ये शिवराज व युवराज या जोडगोळीने जलसंधारण कामाची वाट लावली आहे. पाण्यापेक्षा जास्त पैसाच मुरला असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
प्रस्थापित नेते व युवा नेते यांच्या नावाचा वापर करून शिवराज व युवराज जोड गोळीने तालुक्यातील जलसंधारण विभागाची अनेक कामे निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. तरीसुद्धा, राजकीय दबावापोटी सदरच्या कामांचे मोजमाप करून बीले उचललेली आहेत. कितीतरी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांना गावामध्ये काम मंजूर आहे आणि काम पूर्ण झाले, याची कितीतरी वेळा कल्पना सुद्धा नाही. ग्रामपंचायतीमधील कोणालातरी हाताला धरून युवराज व शिवराज यांनी जलसंधारण विभागांमध्ये नंगानाच केलेला आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत शेतकऱ्यांना पाण्याची चणचण भासत आहे. शासनाने जलसंधारणाची कामे करून पाण्याचे स्तोत्र वाढविण्याचा हेतू बाजूलाच राहिला मात्र, युवराज व शिवराज यांच्या निकृष्ट कामांमुळे पाण्याऐवजी जास्त पैसाच मुरला आहे. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून केलेल्या कामांची चौकशी व्हावी, शेतकऱ्यांच्या या मागणीने जोर धरलेला आहे. शिवराज व युवराज यांनी कोणती मजूर संस्था वापरली, ग्रामपंचायतीमधून कोणाच्या खात्यावर रक्कम कशा पद्धतीने आणली, याचीही खातेनिहाय चौकशी करावी, असेही ग्रामपंचायतीमधील सुज्ञ सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांच्यामधून बोलले जात आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.