लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन बैठकीचे आयोजन….

लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेचे स्वप्न माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे सत्यात उतरले – श्रीनिवास कदम पाटील.
माळशिरस (बारामती झटका)
लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वे प्रकल्प अंतर्गत जमिनीबाबत माळशिरस तालुक्यातील भूसंपादन झालेल्या गावांचे सर्वे नंबर, गट नंबर व त्यांचे नकाशे इत्यादी बाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि. 19/2/2025 रोजी आढावा बैठकीत दिलेल्या सूचनेनुसार उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांच्या अध्यक्षतेखाली २०-२०२५ रोजी सकाळी 11 वाजता उपविभागीय अधिकारी, कार्यालय अकलूज येथे बैठकीचे आयोजन केलेले असल्याचे तहसीलदार माळशिरस यांनी कळविलेले आहे.
सदरच्या बैठकीमध्ये उपअधीक्षक भूमी अभिलेख माळशिरस, मंडल अधिकारी नातेपुते, दहिगाव, फोंडशिरस, सदाशिवनगर, माळशिरस, खुडूस व वेळापूर, ग्राम महसूल अधिकारी धर्मपुरी, गुरसाळे, नातेपुते, फोंडशिरस, मांडवे, पुरंदावडे, माळशिरस, पानीव, विझोरी, खंडाळी, वेळापूर, धानोरे अशा लोकांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.
माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजीतसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी शहा, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून लोणंद-फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न केलेले आहेत. सध्या लोणंद पर्यंत रेल्वे ट्रॅक पूर्ण झालेला आहे. फलटण-पंढरपूर रेल्वेसाठी केंद्रीय रेल्वे बजेटमध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाचा 50% वाटा देण्याचे महाराष्ट्र शासनाने कॅबिनेट बैठकीमध्ये मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे लवकरात लोणंद-फलटण-पंढरपूर अनेक दिवस प्रलंबित राहिलेला रेल्वेचा प्रश्न अखेर माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामुळे मार्गी लागलेला आहे. इंग्रज कालीन रेल्वेचे स्वप्न असणारे अखेर सत्यात उतरले असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेच्या मध्यवर्ती रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य श्रीनिवास कदम पाटील यांनी माहिती दिली.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.