वाघोली येथील पै. विजय माने शेंडगे यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन

वाघोली (बारामती झटका)
मौजे वाघोली ता. माळशिरस, येथील पैलवान विजय विष्णू माने शेंडगे यांचे वयाच्या ३८ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दि. १९ फेब्रुवारी रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या पाश्चात पत्नी, आई, भाऊ असा परिवार असून ते मराठा सेवा संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य उत्तमराव माने शेंडगे यांचे पुतणे व वाघोली गावचे युवक नेते व माजी सरपंच योगेश माने शेंडगे यांचे बंधू होते.
कै. विजयबापू यांचेवर वाघोली येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा तिसरा (अस्थी विसर्जन) शुक्रवार दि. २१ फेब्रुवारी रोजी वाघोली येथील स्मशानभूमीत सकाळी ७.०० वा. आहे
कै. विजय बापू माने शेंडगे यांच्या आकस्मित निधनाने वाघोली गावावर व मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे. परमेश्वर माने शेंडगे परिवाराला या दु:खातून सावरण्याचे बळ देवो आणि कै. विजय माने शेंडगे यांच्या आत्म्याला शांती देवो हीच बारामती झटका परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.