बीयर बारमध्ये उधारीच्या कारणावरून मॅनेजरला मारहाण

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस, येथे हॉटेल प्यासाचे मॅनेजर जयदीप वर्मा यांनी आकाश मोहिते रा. पिसेवाडी, ता. माळशिरस, यांच्याविरुद्ध वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. मागील शिल्लक राहिलेली उधारी मागितल्यावरून आकाश मोहिते यांनी मॅनेजर जयदीप वर्मा यांना सत्तुरने मारहाण केली. याविरुद्ध जयदीप वर्मा यांनी वेळापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
जयदीप वर्मा यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, मी जयदिप शिवबालक वर्मा वय २८ वर्षे व्यवसाय – हॉटेल प्यासा मॅनेजर, रा. शिंदेनगर, वेळापुर, ता. माळशिरस जि. सोलापूर समक्ष वेळापूर पोलीस ठाणेस हजर राहून विचारलेवरून फिर्यादी जबाब देती की, मो. नं.८८०५७७७३५२ मी वरील विकाणी हॉटेल प्यासा परमीट रुम बिअर बार व प्यासा बिअर शॉपीमध्ये मॅनेजर म्हणुन सुमारे १२ वर्षांपासून काम करून मी माझा उदरनिर्वाह करतो. हॉटेल प्यासा परमीट रुम बिअर बार व प्यासा बिअर शॉपीचे मालक पिंटु उर्फ अर्जुन श्रीरंग शिंदे हे आहे.
काल दि. २०/२/२०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मी, हॉटेल प्यासा परमीट राम बिअर बार मध्ये माझे काम करीत असताना तेथे माझ्या ओळखीचा आकाश मोहिते रा. पिसेवाडी, ता. माळशिरस हा दारु पिणेसाठी तेथे आला. त्याने दारु मागवून पिऊन झाले नंतर त्याचे बिल ३५० रु. झाले होते व पहिली उदारी ८५० रु. होती. ते बील मागितले असता त्याने पाच मिनिटे थांबा बील देतो, असे सांगुन तो हॉटेलच्या बाहेर गेला. त्यावेळी हॉटेलमध्ये काम करणारे वेटर दादा मगर, अतुल बाळु चव्हाण, बापु कांबळे, वत्सला चव्हाण असे मिळुन त्यास बिल देणेबाबत विनंती करीत असताना त्याने शिवीगाळी, दमदाटी करून अंगावर मारण्यासाठी धावुन आला व माझ्या कानाखाली दोन चापटा मारल्या. त्यानंतर आकाश मोहीते याने त्याच्या कमरेला असलेला सत्तुर काढून मला मारत असताना मी डावा हात आडवा लावला त्यावेळी माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सत्तुर लागला. तो परत मारत असताना त्याला दादा मगर याने धरुन त्याचे हातातील सत्तुर काढून फेकुन दिला. त्यानंतर आकाश मोहिते हा तेथून निघुन गेला. त्यावेळी मला किरकोळ जखम झाल्याने मी सरकारी दवाखान्यात उपचार करून परत हॉटेलला गेलो. त्यानंतर मी घडलेला प्रकार मालक पिंटु उर्फ अर्जुन श्रीरंग शिंदे हे हॉटेलमध्ये आल्यानंतर त्यांना समक्ष सांगितला. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हॉटेल बंद झाल्यानंतर वेळापुर पोलीस ठाणेस तक्रार देणेकरीता आलो आहे. तरी दि. २०/२/२०२५ रोजी दुपारी ४.०० वाजण्याच्या सुमारास माझ्या ओळखीचा आकाश मोहिते रा. पिसेवाडी, ता. माळशिरस याने मला दारुची मागील उदारी व आजचे बील मागितलेच्या कारणावरुन शिवीगाळ दमदाटी करून त्याचे कमरेचा सत्तुर काढुन मला मारत असताना मी डावा हात आडवा लावला, त्यावेळी माझ्या डाव्या हाताच्या अंगठ्याला सत्तुर लागला आहे. म्हणून, माझी आकाश मोहिते रा. पिसेवाडी ता. माळशिरस याचे विरुध्द तक्रार आहे.
माझा वरील संगणकावर टंकलिखित केलेला फिर्यादी जबाब माझे मालक पिंटु उर्फ अर्जुन श्रीरंग शिंदे रा. वेळापुर यांनी मला वाचून दाखविला असून तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर आहे.
अशी फिर्याद वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल १५७९ पाटील पोलीस ठाणे अंमलदार यांच्या समक्ष दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करत आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.