मांडवे येथे अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांचा ‘अभी-आमु लाईव्ह इन कॉन्सर्ट’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त श्रीशिवछत्रपती तरुण मंडळ, मांडवे आयोजित शिवशंभो गर्जना भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन
मांडवे (बारामती झटका)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ जयंती निमित्त श्रीशिवछत्रपती तरुण मंडळ मांडवे आयोजित शिवशंभो गर्जना भव्य संगीत सोहळ्याचे आयोजन दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.३० वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, मांडवे, ता. माळशिरस, येथे करण्यात आले आहे.
इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षरांनी नाव कोरलेल्या वीर रणधुरंधर योद्धांचा जागर रणवाद्यांसोबत वाजवायला आणि गाजवायला ‘अभी-आमु लाईव्ह इन कॉन्सर्ट’ मांडवे गावात होत आहे. यावेळी अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांचा लाईव्ह कॉन्सर्ट पहिल्यांदाच मांडवे गावात होत आहे.
तरी जास्तीत जास्त शिवप्रेमींनी आणि नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सादरकर्ते गायक अभिजीत जाधव यांनी स्वतः केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.