मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांना शुभेच्छा देऊन कार्यकर्त्यांचे हजारो हत्तीचे बळ वाढवले…

माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठान पुरंदावडे सदाशिवनगर यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या देवाभाऊ केसरी भव्य बैलगाडी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/DGknmuPIKek/?igsh=dDE1OHlpYW8yZGw=
सदरच्या देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यतीस व लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांना महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री शुभेच्छा देताना म्हणतात, मला अतिशय आनंद आहे की, माळशिरसकरांचा अतिशय कामाचा माणूस म्हणजे माझा मित्र रामभाऊ सातपुते यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीक्षेत्र महालक्ष्मी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. ५ मार्च रोजी पुरंदावडे-सदाशिवनगर येथे होणाऱ्या या शर्यतीसाठी सर्व बैलगाडा चालक-मालक संघटनांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देखील देतो. या शर्यतीचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साह वाढवावा, अशी विनंती या निमित्ताने करतो आणि रामभाऊंना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. अशा शुभेच्छाने कार्यकर्त्यांमध्ये हजारो हत्तींचे बळ वाढले आहे.

महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडून माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात खऱ्या अर्थाने वंचित घटकांना न्याय देण्याची भूमिका ठेवलेली आहे. सातत्याने मतदार संघात विकासकामांचा सपाटा लावलेला होता. विकासकामांचा डोंगर उभा करीत असताना सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे आरोग्याची सेवा करून अश्रू पुसण्याचे काम केलेले आहे.
देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षांमध्ये मतदार संघ कायम विकासाच्या बाबतीत हलता ठेवलेला होता. गेल्या ७० वर्षांमध्ये अनेक प्रलंबित प्रश्न होते, ते प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे माळशिरस विधानसभा मतदार संघात तीन पिढ्यांचे मोहिते पाटील यांचे राजकारण व तीस वर्षाचा विरोधी गटाचा संघर्ष समोर असताना सुद्धा विकासाच्या जोरावर राम सातपुते यांना एक लाख आठ हजाराच्या वर मताधिक्य मिळालेले होते. खऱ्या अर्थाने विकासकामांची पोचपावती माळशिरस तालुक्याच्या मतदारांनी दिलेली आहे. मतदारांच्या विश्वासाला पात्र राहून माजी आमदार राम सातपुते यांचे मतदारसंघात काम सुरू आहे.

भारतीय जनता पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानाला उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या शाखा शुभारंभ करीत असताना प्रत्येक गावामध्ये जेसीबीने पुष्पवृष्टी करून महिलांनी औक्षण करीत कार्यकर्ते फटाक्यांच्या व हलगीच्या निनादांमध्ये जल्लोषामध्ये शाखांचे उद्घाटन करीत आहेत. माळशिरस तालुक्यात भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकेल, असा आशावाद कार्यकर्त्यांना आहे.

देवाभाऊ केसरी बैलगाडी शर्यत व लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार राम सातपुते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांमध्ये हजारो हत्तींचे बळ वाढविलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.