यात्रा, उत्सव, उरूस, पालखी सर्वच ठिकाणी उत्साहाने कार्यरत असणारे माळशिरस महावितरण

अकलूज (बारामती झटका)
महाराष्ट्र विद्युत कंपनी अनेक वेळा टीकेचे धनी असतात. परंतु, सध्या अकलूज विभागाचे एक्झिक्यूटिव्ह श्री. अण्णासाहेब काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अभियंता प्रशांत कालेकर, उप अभियंता शितल डोळे, पिलिव विभागाचे उपअभियंता थोरात साहेब, लाईनमन योगेश देसाई आणि माळशिरस उपविभाग सध्या उत्साहाने आपली सेवा देत असतात, याची प्रचिती गेल्या अनेक यात्रा, पालखी, उरूस अशा अनेक ठिकाणी जाणवली.
सध्या तरंगफळ यात्रा सुरू असून तापमानात भरपूर वाढ झालेली असून विजेची मागणी वाढली असताना या ठिकाणी तंत्रज्ञ वायरमन कल्याण माखले यांचे नियोजन योग्य ठरत असून विना अडथळा विद्युत वितरण सेवा सुरू आहे. त्यामुळे यात्रेकरू, ग्रामस्थ, भक्त माळशिरस विद्युत वितरण उपविभागावर समाधानी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्रामस्थांकडून महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी माळशिरस उपविभाग यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.