दत्तात्रेय धाईंजे यांना पीएच.डी. प्रदान

पुणे (बारामती झटका)
‘महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी’ तर्फे अॅड. दत्तात्रेय धाईंजे यांना ‘सायबर लॉ’ विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांच्या संशोधनाचा विषय ‘कॉम्बॅटिंग् सायबर क्राइम इन इंडिया इश्यू अॅण्ड चॅलेंजेस’ असा होता. त्यांना डॉ. राहुल सानगावकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.दत्तात्रेय धाईंजे यांचे प्राथमिक शिक्षण मारुती नाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय, माळशिरस व बारावीपर्यंतचे शिक्षण गोपाळराव देव प्रशाला व ज. चे. आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, माळशिरस येथे झाले आहे. जिल एज्युकेशन इंजीनियरिंग कॉलेज, पुणे येथे बी. आय. टी. पूर्ण केले. तर मॉडर्न कॉलेज, पुणे येथे एम. बी. आय. टी., शंकरराव चव्हाण लॉ कॉलेज, पुणे येथे एलएलएम पूर्ण केले. तसेच नॅशनलला युनिव्हर्सिटी नागपूर येथे पीएचडी केली. गोपाळराव देव प्रशाला येथे माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून असणारे भगवान दामोदर धाईंजे यांचे ते चिरंजीव आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.