ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा माळशिरस तालुका दौरा जाहीर..

कॅबिनेट मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी आमदार राम सातपुते या त्रिमूर्तींच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी पिलीव शाखा उद्घाटन व जाहीर पक्ष प्रवेश सोहळा..
पिलीव (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील पिलीव गावाला शनिवार दि. 22/03/2025 रोजी दौरा जाहीर झालेला आहे. मंत्री महोदय सकाळी सात वाजता मुंबई येथील प्रचितगड येथून शासकीय वाहनाने पुणे-शिरवळ-लोणंद मार्गे बोराटवाडी, ता. माण, येथील कमलकुंज निवासस्थानी दुपारी 12.30 वाजता आगमन होणार आहे. सायंकाळी सहा वाजता बोराटवाडी येथून म्हसवड मार्गे पिलीव, ता. माळशिरस, कडे प्रयाण करून सायंकाळी 7.00 वाजता पिलीव येथे भारतीय जनता पार्टीचे शाखा उद्घाटन व जाहीर पक्ष प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहून रात्री 8.30 वाजता पिलीव वरून बोराटवाडीकडे प्रयाण करणार आहेत.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या शुभ हस्ते भारतीय जनता पार्टी शाखा उद्घाटन व जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम सोहळा संपन्न होणार आहे. माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे.

गेल्या पाच वर्षांमध्ये तत्कालीन लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी पिलीव व पिलीव पंचक्रोशीतील गेल्या 70 वर्षात रखडलेली विकासकामे मार्गी लावलेली असल्याने मोहिते पाटील गटाचे व जानकर गटाचे अनेक नेते व कार्यकर्ते माजी आमदार राम सातपुते यांच्या कार्यावर समाधानी आहेत. परिसराचा उर्वरित विकास करण्याकरता त्रिमूर्तींच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन व जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न होणार आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत मोहिते पाटील व जानकर गट एकत्र असताना सुद्धा पिलीव गावाने कामाचा माणूस आपला माणूस म्हणून राम सातपुते यांना लीड दिलेले आहे. राम सातपुते यांनी पिलीवच्या महालक्ष्मी देवीच्या जमिनीचा व रस्त्याचा प्रश्न मार्गी लावलेला असल्याने पिलीव परिसरातील अनेक महालक्ष्मी देवीभक्त यांनी राम सातपुते यांच्या कार्याकडे पाहून मतदान दिलेले होते. तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी संसदेत व तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागातील प्रस्थापित नेत्यांनी कायम जाणीवपूर्वक वंचित ठेवलेल्या निरा देवधरच्या 22 गावांचा पाण्याचा प्रश्न मांडलेला होता. निरादेवधरच्या कमांडमधील सर्व गावांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी निरा देवधरच्या प्रश्नाला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून 22 गावांचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. भविष्यामध्ये आपल्या गावचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय नाही, असा ठाम विश्वास नेते व कार्यकर्त्यांचा झालेला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे पदभार आल्यानंतर माळशिरस तालुक्याला हक्काचे तीन लोकप्रतिनिधी मिळालेले आहेत. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाच्या विचाराची सत्ता असल्याने माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक आहेत. माळशिरस तालुक्यात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता अभियानामध्ये सभासदांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे चेअरमन, विविध पक्षांचे पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होऊन जंगी कार्यक्रम पिलीव येथे होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.