महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर….

मा. खा. रणजीतसिंह नाईक निंबाळकर व मा. आ. राम सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत फोंडशिरस येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न होणार…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांचा रविवार दिन. 23/03/2025 रोजी सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झालेला आहे.
बोराटवाडी येथील कमलकुंज येथून दुपारी 03.00 वाजता शासकीय वाहनाने माळशिरस तालुक्यातील फोंडशिरस गावाकडे प्रयाण होणार आहे. फोंडशिरस येथे दुपारी 04.00 वाजता आगमन होणार आहे. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभास माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

फोंडशिरस येथे विविध विकासकामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा त्यामध्ये फोंडशिरस पिरळे रोड ते शेंडेमळा रस्ता ग्रा.मा. 386 साखर 0/000 ते 1/600 मध्ये सुधारणा करणे 17.00 लाख रुपये, प्रजिमा 96 फोंडशिरस ते पेडकर मळा रस्ता ग्रामा 674 साखळी क्रमांक 0/000 ते 2/00 मध्ये सुधारणा करणे 17.00 लाख रुपये, मौजे फोंडशिरस येथील एकनाथ वाघमोडे वस्तीकडे जाणारा रस्ता करणे 50.00 लाख रुपये, मौजे फोंडशिरस मो. सिमेंटनाला बंधारा क्रमांक एक 32.48 लाख रुपये, मौजे फोंडशिरस मोटेवाडी सिमेंट नाला बंधारा क्रमांक दोन 33.70 लाख रुपये, मौजे फोंडशिरस मोटेवाडी सिमेंट नाला बंधारा क्रमांक चार ते 30.71 लाख रुपये, मौजे फोंडशिरस येथील कोडलकर मळा नंबर दोन सतोबा बिरोबा मंदिरा शेजारी सभा मंडप बांधणे 10.00 लाख रुपये, मौजे फोंडशिरस ते कुचेकर वस्ती ते माणिक बळवंत वाघमोडे वस्ती ग्राम 174 रस्ता करणे 50.00 लाख रुपये, मौजे फोंडशिरस येथील पिरळे रोडवरील पुलाचे बांधकाम करणे 300.00 लाख रुपये अशा विविध कामांचा त्रिमूर्तींच्या उपस्थितीत भूमिपूजन उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.
सायंकाळी 05.00 वाजता फोंडशिरस येथून करमाळा येथील मोरवड येथे सदाशिव मोहोळकर शिक्षण संस्था जंक्शन संचलित महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय मोरवड आयोजित रोप्य महोत्सव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रम समारंभास सायंकाळी 07.00 वाजता उपस्थित राहणार आहेत. मोरवड येथून 09.30 वाजता मोटारीने कुर्डूवाडी कडे प्रयाण करतील. 11.30 वाजता सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईकडे रवाना होणार आहेत. सोयीनुसार प्रचितगड शासकीय निवासस्थान मुंबई येथे प्रयाण होणार आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.