लाचखोर तलाठी व मंडलाधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात….

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दमदार कामगिरी…
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून लाच घेणाऱ्या तलाठी आणि सहाय्यक महसूल अधिकारी यांना अटक केली आहे. आ.लो.से. श्रीमती ऐश्वर्या धनाजी शिरामे, तलाठी, सजा ताड सौंदणे ता. बार्शी, जि. सोलापूर आणि रवींद्र आगतराव भड, सहायक महसूल अधिकारी, बार्शी तहसील कार्यालय यांना १७ हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले असून अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
महसूल अधिनियम 1966 चे क 85 अंतर्गत प्रस्ताव तहसीलदार यांना सादर करून मंजूर करून घेण्याकरिता म्हणून यातील लोकसेवक श्रीमती ऐश्वर्या शिरामे यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000/- रु. लाचेची मागणी केली. दि. 25/02/2025 रोजी पडताळणी केली असता आरोपीने पंचासमक्ष तडजोड अंती 17,000/- रुपये लाचेची मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर दि. 27/02/2025 रोजी आलोसे तलाठी श्रीमती ऐश्वर्या धनाजी शिरामे यांचेवर सापळा कारवाई करण्यात आली परंतु ती यशस्वी झाली नाही. त्यानंतर आलोसे श्रीमती शिरामे यांचे सांगण्यावरून दि. 18/03/2025 रोजी आलोसे सहायक महसूल अधिकारी रवींद्र भड यांचेवर सापळा कारवाई केली परंतु, त्यांनी त्यावेळी पैसे न घेता काम झाल्यावर घेतो असे म्हणून तलाठी शिरामे यांचे लाच मागणीस प्रोत्साहन दिले. त्यानंतर दि. 03/04/2025 रोजी यातील आरोपी लोकसेवक तलाठी श्रीमती शिरामे यांचेवर सापळा कारवाई केली असता, त्यांनी तक्रारदार यांचेकडून लाच रक्कम 17,000/- रु. पंचासमक्ष स्वीकारले असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यामध्ये आरोपीच्या अंग झडतीत लाच रक्कम 17,000 व 1 मोबाईल फोन आणि रवींद्र भड यांच्याकडे 1 मोबाईल फोन मिळाला आहे. तसेच दोन्ही आरोपींच्या घरांची झडती घेण्यासाठी पथके तात्काळ रवाना करण्यात आले असून घरझडतीची प्रक्रिया सुरू आहे.
सापळा कारवाई नंतर यातील तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने बार्शी शहर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण येथे आरोपी लोकसेवक तलाठी श्रीमती शिरामे यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7, 7 अ प्रमाणे तसेच आरोपी लोकसेवक सहायक महसूल अधिकारी श्री. भड यांचे विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपींचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला असून, पुढील निरीक्षण करून तपास करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे.
ही कारवाई श्री. शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक, लाप्रवि, पुणे परिक्षेत्र, डॉ. शीतल जानवे/खराडे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे, श्री. विजय चौधरी, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी व सापळा अधिकारी श्री. उमाकांत महाडिक, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. सोलापूर यांच्या सापळा पथकाने पो. ह. अतुल घाडगे, पो. ह. मुल्ला, पो. ना. स्वामीराव जाधव, म. पो. कॉ. प्रियांका गायकवाड, चालक पो. ह. राहुल गायकवाड व चालक पो. शि. श्याम सुरवसे सर्व ला. प्र. वि. सोलापूर यांनी केली आहे.
कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पर्यवेक्षण अधिकारी :-
श्री. गणेश कुंभार,
पोलीस उप अधीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मोबाईल क्र. 9764153999
कार्यालय क्र.0217 2312668
ईमेल dyspacbsolapur@ gmail.com
टोल फ्री क्र. 1064
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.