प्राजक्ता महाडिक हिची पंजाब नॅशनल बँकेत अधिकारी पदावर निवड

अंकोली (बारामती झटका) (दशरथ रणदिवे यांजकडून)
मोहोळ तालुक्यातील मौजे अंकोली येथील भैरवनाथ विद्यालयातील माजी विद्यार्थिनी प्राजक्ता लिंबाजी महाडिक हिची पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकारी पदी नुकतीच निवड झाली आहे. बँकिंग कार्मिक निवड संस्था म्हणजे आय. बी. पी. एस. कडून झालेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यामध्ये प्राजक्ता लिंबाजी महाडिक हिची अँग्रीकल्चर फील्ड ऑफिसर म्हणून पंजाब नॅशनल बँकेत निवड झाली आहे.
प्राजक्ताचे तिचे वडील प्राथमिक शिक्षक आहेत. प्राजक्ताचे माध्यमिक शिक्षण भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, अंकोली येथे झाले आहे. गणित विषयात निपुण असल्याने ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली, असे तिचे मत आहे. अंकोली व परिसरातून तिचे कौतुक होत आहे. येथील भैरवनाथ विद्यालयातील या दोन वर्षात १२ माजी विद्यार्थी अधिकारी म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रात निवडले आहेत. त्यामुळे अंकोली पंचक्रोशी शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर ठरले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.