ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी

बिबवेवाडी (बारामती झटका)
बिबवेवाडी पोलीसांनी ब्लॅकमेल करून बलात्कार करणाऱ्या आरोपीची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सदरबाबत अधिक माहिती अशी की, बिबवेवाडी पोलीस ठाणे गुन्हा रजि.नं. गुरनं ६९/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४,६४ (२) (एम), ३०८(२), ३५१ (३), ११५ (२) अन्वये दाखल असून यातील फिर्यादी (निर्भया) यांना मागील ८ महीन्यांपासुन आरोपी नामे किरण औंदुंबर ढाळे याने ब्लॅकमेल करुन फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देवुन त्यांना शॉर्टकपडे घालण्यास प्रवृत्त करुन व्हिडीओ कॉल करुन त्यावर फिर्यादी यांचे स्क्रीन शॉट काढुन, जबरदस्तीने मनाविरुद्ध शारिरीक संबंध ठेवुन, फिर्यादी यांना मारहान करून त्यांचे पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने ब्लॅकमेल करुन सोन्याचे दागिने घेवुन गेला म्हणून गुन्हा दाखल आहे.
दाखल गुन्ह्यातील आरोपीचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे व पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री. अशोक येवले, तपास पथकातील अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनाठिकाणी तात्काळ भेट दिली. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, विशाल जाधव, प्रणय पाटील यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार आरोपी हा त्याचे मुळ गावी पंढरपुर येथे पळून जात असताना त्यास सापळा रचून स्वारगेट परीसरात ताब्यात घेवून त्यास अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता आरोपीस न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्याने त्यास येरवडा कारागृहात जमा केले आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त, वानवडी विभाग धन्यकुमार गोडसे, यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक गुन्हे सुरज बेंद्रे, तपास पथकातील अधिकारी पोलीस उप निरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार संजय गायकवाड, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे, ज्योतिष काळे, प्रणय पाटील, विशाल जाधव, आशिष गायकवाड, रक्षित काळे यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.