सातारा न्यायालयातील ह्रदयस्पर्शी खटला…..

आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे…
सातारा (बारामती झटका)
वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांची सेवा करण्यासाठी मोठा भाऊ मला संधीच देत नाही, त्यासाठी लहान भावाने न्यायालयात मोठ्या भावा विरूद्ध दावा ठोकला. वयाची 90 वर्ष पार केलेल्या आई-वडिलांना माझ्याकडे सुपूर्त करावे, मी ही त्यांचा मुलगा आहे. माझाही आई-वडिलांना सांभाळण्याचा अधिकार आहे. माझ्या आई-वडिलांची माझा मोठा भाऊ अत्यंत उत्तम प्रकारे गेली २५ वर्ष सेवा करत आहे. आता मोठा भाऊही वयस्कर झाला आहे. त्याला आता आई-वडिलांना नीट सांभाळताना त्रास होईल. तेव्हा येथून पुढे मला आई-वडिलांची सेवा करण्याची संधी द्यावी. आई-वडिलांचे खुप प्रेम मोठ्या भावाच्या घराला मिळाले आहे, आता माझ्या मुलांनाही आजोबा-आजीचा सहवास लाभला पाहीजे व आम्हाला आमच्या दैवतांची सेवा करता आली पाहीजे, माझा मोठा भाऊ अत्यंत मोठ्या मनाचा आहे, त्याने आई-वडिलांचा अत्यंत चांगला सांभाळ केला आहे, पण आता तोच थकला आहे. मला त्याचीही चिंता वाटते, त्याचीही सेवा मला करायची आहे, तेव्हा मला माझे आई-वडील हवे आहेत. आई-वडिलांना सांभाळण्यासाठी दोन्ही भाऊ कोर्टात भांडत आहेत, हा विलक्षण प्रकार आहे….. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या नालायक अवलादींच्या गालफडात लावलेली ही जबरदस्त चपराक आहे.
जज साहेब तर चकीतच झाले… जेथे आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारा जमाना असताना तेथे ही श्रावणबाळे कशी जन्माला आली ? जजला निकाल देता येइना, त्यांनी आई-वडिलांनाच विचारले, आपली काय ईच्छा आहे ? तेव्हा ते म्हणाले जज साहेब आपणच सांगा काय ते. तेव्हा जजने निकाल लहान भावाच्या बाजूने दिला. आई-वडिलांना लहान भावाच्या ताब्यात दिले, तसा मोठा भाऊ धायमोकलून रडू लागला. आई-वडिलांना दुरावणार याचे त्याला खुप दु:ख झाले. धन्य ते आईवडिल, ज्यांनी इतके उच्च संस्कार मुलांना दिले. या कलियुगात आई-वडिलांना मारहाण करणारे जन्माला आले आहेत. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणारे आय.आय.टी. इंजिनियर्स आहेत, सनदी अधिकारी व नोकरदार कर्मचारी आहेत, उच्चभ्रू डाॅक्टर्स आहेत, विशेष म्हणजे मुलांवर संस्कार घडवण्याची जबाबदारी असलेले शिक्षक शिक्षिका आहेत. कळस म्हणजे न्यायनिवाडा करणाऱ्या न्यायाधिशांचे आई वडिल वृध्दाश्रमात आहेत. या देशात शिकून परदेशात नोकरी करणारे महाभाग आहेत, जे देशसेवा करायची सोडून परकियांचे नोकरदार झाले आहेत. परत आई-वडीलांना विसरले आहेत. परदेशात ज्यांची मुले आहेत अशा कित्येकांची अवस्था निपुत्रिकांसारखी झालेली आहे. शेतकरी आत्महत्या करतात पण आई-वडिलांना सांभाळतात, पण या शिक्षित, उच्चशिक्षित अवलादी पार बिघडल्या आहेत, कृतघ्न झाल्या आहेत. आई-वडिलांच्या अंत्यविधीला या अवलादी हजर देखिल राहत नाहीत.
वरील घटना आजकालच्या बिघडलेल्या मुलांना बोध देणारी आहे. वृध्दाश्रमात झालेली वाढ ही भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी अधोगती आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.