पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या कमलकुंज निवासस्थानी भेटीसाठी आलेल्यांचे आदरातिथ्य…

बोराटवाडी (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांच्या बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी भेटीसाठी आलेल्यांचे आदरातिथ्य करून व्यक्तिगत व सार्वजनिक कामाचा निपटारा केला जात असल्याने सोलापूर जिल्ह्यासह राज्यामध्ये ना. जयकुमार गोरे यांच्या कार्याची चर्चा सुरू आहे.

माण-खटाव नावाचा उल्लेख केला की दुष्काळी पट्टा हे आपोआपच तोंडामध्ये शब्द येतात. अशा दुष्काळी पट्ट्यामध्ये चार वेळा जनसंपर्क व जनतेच्या कार्यावर निवडून येणारा पट्टा म्हणजेच गोरगरीब जनतेचा व शेतकऱ्यांचा तारणहार जयाभाऊ आहेत. माण-खटाव चा दुष्काळाचा कलंक पुसण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी आणण्यासाठी सदैव धडपडू असणारा लोकप्रतिनिधी म्हणून जयाभाऊ यांच्याकडे पाहिले जाते. प्रतिकूल परिस्थितीतून राजकारणाला सुरुवात करून चार वेळा विधानसभेवर गेलेले आहेत. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली माढा लोकसभेचे तत्कालीन खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या सहकार्याने सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद यशस्वीपणे सांभाळलेले होते.

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात जया भाऊ यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सातारा व सोलापूर जिल्ह्याचा समन्वय राहण्याकरता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची सुद्धा जबाबदारी देण्यात आली. जयाभाऊ यांचे संपर्क कार्यालय दहिवडी येथे आहे.
मतदारसंघातील सर्व नेते कार्यकर्ते व मतदार आपल्या प्रश्नांची सोडवणूक करून घेत असतात. पालकमंत्री पदाची जबाबदारी वाढल्याने सोलापूर जिल्ह्यातील अनेक लोक व्यक्तिगत व सार्वजनिक कामे घेऊन येत असतात. सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत आलेल्या लोकांच्या अडीअडचणी, प्रश्न सोडवित असतात. लांबून येण्याचे असल्याने सकाळी घरातून लवकर अनेक लोक येत असतात, अशावेळी त्यांना जयाभाऊंचे आदरातीत्य असते. थंडगार जारचे पिण्याकरता पाणी, नाश्ता करण्याकरिता चटकदार पोहे व कडक चहा दिला जातो. आलेल्या लोकांना आपुलकी, जिव्हाळा व प्रेम आपोआप निर्माण होते. अनेक लोकप्रतिनिधी यांच्याकडे कामानिमित्त गेल्यानंतर साधे पाणी सुद्धा मिळत नाही मात्र, सर्वसामान्य व प्रतिकूल परिस्थितीतून जयाभाऊ यांचे राजकीय नेतृत्व घडलेले असल्याने त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न माहित असतात. त्यामुळे कमलकुंज निवासस्थानी भेटीसाठी आलेल्यांचे यथोचित्य आदरातिथ्य होत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.