यशवंत बाबांच्या मंदिरासाठी पाच कोटींचा निधी देणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

सौ. सोनिया गोरे यांची सद्गुरु यशवंत बाबा देवस्थान यशवंत हो, जयवंत हो, सिद्धेश्वर कुरोली ट्रस्ट स्वीकृत सन्माननीय विश्वस्त पदी निवड !
कुरोली (बारामती झटका)
ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सुविद्य पत्नी सो. सोनिया गोरे यांची दि. 12 एप्रिल 2025 रोजी यशवंत हो जयवंत हो देवस्थान ट्रस्ट सिद्धेश्वर कुरोली स्वीकृत सन्माननीय विश्वस्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सिद्धेश्वर कुरोली ही श्री यशवंत बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. समाधी मंदिराचे काम अनेक वर्षापासून सुरू असून निधीची कमतरता आहे. या मंदिराचे काम करण्यासाठी शासनाकडून पाच कोटी रुपयांचा निधी लवकरच देणार असल्याची ग्वाही ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. बाबांच्या आशीर्वादाने ग्रामविकास महत्त्वाचे खाते माझ्याकडे आहे हे, स्थळ सध्या शासनाच्या ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र आराखड्यात आहे. विश्वस्तांकडून ‘अ’ वर्ग देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच देवस्थान ट्रस्ट आणि आश्रमाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या हस्ते करण्यात आला. ट्रस्टच्या अध्यक्षपदी जनार्दन मोरे काका, उपाध्यक्षपदी संदीप सावंत, गजानन कुंभार, सचिवपदी चंद्रसेन देशमुख, खजिनदारपदी अनिल माने, अजित देसाई, महेश देशमुख, गजानन पाटील, आनंद माने तर स्वीकृत सन्माननीय विश्वस्त पदी सौ. सोनिया गोरे यांची निवड करण्यात आली आहे .
यावेळी गटविकास अधिकारी जस्मिन शेख, ट्रस्टचे माजी चेअरमन मा. पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे भैय्या, मा. जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे (आबा), आंधळी गावचे आदर्श सरपंच दादासाहेब काळे, विनायक खाडे, विधानसभा प्रमुख सोमनाथ भोसले, युवानेते विशाल बागल, पंचायत समितीचे मा. सदस्य डॉ. विवेक देशमुख, प्रगतशील शेतकरी हरिभाऊ बनसोडे, सरपंच शहाजी देशमुख, संतोष भंडारे, रामभाऊ पाटील, गणेशशेठ गोडसे, रणजित देशमुख, हेमंत देशमुख, डॉ. सुजित ननावरे, अभय देशमुख, जितेंद्र देशमुख, कमलाकर देशमुख, उमेश सुतार, अमरसिंह देशमुख, कन्हयालाल फडतरे, दादासाहेब माने, कुमार पाटोळे यांच्यासह ट्रस्टचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर देवस्थान व श्री सद्गुरु यशवंतबाबा देवस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द देवस्थान आहे. मोठया प्रमाणावर भाविक श्री सिद्धेश्वर व सद्गुरु यशवंत बाबांच्या दर्शनार्थ सतत या ठिकाणी येत असतात. श्री सद्गुरु यशवंत बाबा देवस्थान यशवंत हो जयवंत हो ट्रस्ट ही सर्वात धार्मिक विश्वस्त ट्रस्ट म्हणून प्रसिध्द आहे. सन्माननीय विश्वस्त म्हणून सौ. सोनिया गोरे यांची झालेली नियुक्ती ही विशेष महत्वाची आहे. सौ. सोनिया गोरे या नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात. त्यांची सद्गुरु यशवंत बाबा यांच्यावर असलेली अढळ श्रद्धा आज ह्या नियुक्तीमुळे फळाला आली आहे.
श्री सद्गुरु यशवंत बाबा देवस्थान यशवंत हो जयवंत हो ट्रस्ट सिद्धेश्वर कुरोली सन्माननीय विश्वस्त म्हणून निवड झाल्यानंतर सौ. सोनिया गोरे म्हणाल्या, श्री सद्गुरु यशवंत बाबा महाराजांच्या दर्शनाने मन:शांती लाभते. या ट्रस्टच्या सदस्यपदी माझी झालेली नियुक्ती ही माझ्यासाठी सेवेची एक संधी आहे. मी पुर्ण शक्तीने, निष्ठेने, भक्तीने या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. ट्रस्टचे विविध सेवाभावी उपक्रम महाराष्ट्रातील जनतेपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करेन, असेही त्या म्हणाल्या. या नियुक्तीबद्दल सर्व विश्वस्तांचे आभारही त्यांनी व्यक्त केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.