ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणी प्रश्नावर बैठकीचे आयोजन….

माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागणीवरून बैठकीचे आयोजन, लोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांची विशेष उपस्थिती…

मुंबई (बारामती झटका)

महाराष्ट्र राज्याचे मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री, जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) यांचे अध्यक्षतेखाली मंत्रालय, मुंबई येथील दालनामध्ये माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रलंबित पाणी प्रश्नावर जलसंपदा विभागाची मंत्रालयीन बैठकीच्या मागणीवरून जलसिंचन प्रकल्प व पाणी प्रश्नाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांची विशेष उपस्थिती होती. माळशिरस तालुक्यातील कायम दुष्काळी पश्चिम भागातील 22 गावांचा निरा देवधर प्रकल्पातील गावांच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी अथक प्रयत्न अंतिम टप्प्यात आलेला आहे.

या बैठकीतील प्रमुख मुद्दे | मागण्या –
1) फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव तालुक्यातील 26 गावांचा प्रलंबित पाणी प्रश्नावर लवकरच तोडगा काढण्याचे ठरले. 52 टीएमसी पाणी जे फेर जलनियोजनात मिळाले आहे. त्याचा लाभ या भागातील शेतकऱ्यांना व २६ गावांना मिळण्यासाठी त्यामध्ये समाविष्ट असलेली व वंचित राहिलेल्या अशा सर्वच २६ गावांचा समावेश करून त्यांना पाणी देण्यासाठी आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश मा. जलसंपदा मंत्री राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या कडून देण्यात आले.
2) नीरा देवघर प्रकल्पातून निरा देवघर उजव्या कालव्यातून धोम बलकवडी कालव्यात सोडणे करिता मंजूर असलेले 93 टीएमसी पाणी जे उतरोली येथून कालवाजोड प्रकल्प पूर्ण करून सोडण्यात येणार आहे. त्या पाण्याचा विसर्ग व वेग संतुलीत करण्यासाठी मंजूर असलेली नीरा देवघरची दुसरी उपसासिंचन योजना योजना वाघोशी येथे कार्यान्वित करून 93 टीएमसी पैकी काही पाणी या उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून धोम बलकवडी कालव्यात सोडण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी लवकर पाठवण्याचे आदेश देण्यात आले.

मतदारसंघातील या निरा- देवधर च्या पाण्यामुळे माळशिरस तालुक्यातील कोथळे, कोरूडे, पिंपरी, फडतरी (शिवारवस्ती), लोंढे-मोहितेवाडी, लोणंद, गिरवी, भांब, रेडे, कण्हेर, माणकी, इस्लामपूर, गोरडवाडी, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती, तरंगफळ, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, जळभावी या 22 गावांना या योजनेचा फायदा होणार आहे.
3) माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या परंतु मागील काही महिन्यांपूर्वी ज्या 16 गावासमावेश नीरा देवघर च्या लाभक्षेत्रात झाला आहे. त्या गावांना पाण्याचा लाभ मिळणे कामी पुढील चार महिन्यात प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात येतील, असे स्पष्टीकरण देण्यात आले.
4) सांगोला तालुक्यास यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले नीरा देवघरचे पाणी मिळण्याचा मार्ग आजच्या बैठकीत मोकळा झाला.
5) सोळशी प्रकल्पाचा (DPR) आराखडा तयार करून पुढील दोन महिन्यात अंतिम कॅबिनेट मंजुरीसाठी सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
7) धोम बलकवडी कालव्याच्या पोट पाटाची कामे किमी १२८ ते १४७ वितरण नलिकांची कामे ज्यांना तांत्रिक मंजुरी मिळाली आहे. अशा कामांना अंतिम मंजुरी देऊन लवकरच निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
8) ३१/०७/२०२३ रोजी मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रालयीन बैठकीत कृष्णेच्या पुराचे पाणी वळवून दुष्काळी भागास देणेकामी आशियाई बँकेची मदत घेऊन ही योजना राबवणे कामी व याचा सर्वे करणेकामी मंजुरी मिळाली होती. याचा (DPR) आराखडा तयार करून अंतिम मंजुरीसाठी पाठवण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले. या योजनेचा लाभ फलटण माण या दुष्काळी तालुक्यांनाही मिळणार असलेने या योजनेस तेवढेच महत्व प्राप्त झाले आहे.
9) वरील विषयांबरोबरच शिवथर घळ येथून समुद्रास जाणारे किंबहुना वाया जाणारे पाणी नीरा खोऱ्यात घेणे बाबतच्या सर्वेस मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मागील काळात आदेश दिले होते. झालेल्या सर्वेनुसार अंतिम आराखडा सादर करणेचे आदेश जलसंपदा मंत्री महोदयांनी दिले.

या महत्वपूर्ण बैठकीस ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, माजी आमदार राम सातपुते, सातारा जिल्हाध्यक्ष भाजपा धैर्यशील पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब सोळसकर, शिवरुपराजे खर्डेकर, MKVDC संचालक माणिकराव सोनवलकर, भाजपा युवा मोर्चाचे सोलापूर ग्रामीण पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष तथा निरा देवधर उर्वरित संघर्ष समिती अध्यक्ष शिवराज पुकळे, जलसंपदा विभाग अधिकारी, प्रधान सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक कपोले साहेब, मुख्य अभियंता गुणाले साहेब, तसेच प्रकल्पीय अधिकारी, फलटण, कोरेगाव, माळशिरस, सांगोला, माण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button