ताज्या बातम्यासामाजिक

शिंदी खुर्द येथील नवीन तलाठी सझामुळे ग्रामस्थांची गैरसोय दूर होणार – सौ. सोनिया जयकुमार गोरे

शिंदी (बारामती झटका)

जनतेच्या सोयीसाठी तलाठी कार्यालय उभारता यावे म्हणून ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी मतदारसंघात सुमारे ४० तलाठी कार्यालयांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. आज शिंदी खुर्द येथे तलाठी कार्यालयाचे भूमिपूजन भाजपा कार्यकारणी सदस्या श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या संचालिका सौ. सोनिया जयकुमार गोरे (वहिनीसाहेब ) यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. अर्जुन तात्या काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन मा. श्री. अरुण गोरे (आबा), आंधळी गावचे सरपंच मा. श्री. दादासाहेब काळे, परकंदी गावचे सरपंच बाळासाहेब कदम, शिंदी खुर्द गावचे सरपंच प्रमोद कद्रे, उपसरपंच नीलम जाधव, विठ्ठल जाधव, संतोष जाधव, मा. सरपंच दादासाहेब जगदाळे, चेअरमन शामराव जाधव, विनोद बोराटे, तुकाराम जाधव, अविनाश जाधव, बाळासाहेब जाधव आदी मान्यवरांसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते.

नागरिकांना सातबारा, इतर दस्तऐवज पुरविण्याबरोबरच आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी तलाठी धाव घेतात. शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांची असते. त्यामुळे तलाठी हा गावाचा केंद्रबिंदू असतो. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या विशेष प्रयत्नातून आपल्या मतदारसंघात ४० तलाठी कार्यालयांना निधी उपलब्ध झाला आहे. नवीन तलाठी कार्यालय सझा सुरु झाल्यानंतर ग्रामस्थांना याचा लाभ होणार असून त्यांची गैरसोय आता दूर होणार आहे, असे अर्जुन (तात्या) काळे व अरुण गोरे (आबा) यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button