ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा बिदाल जिल्हा परिषद गटातील पदाधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य नागरी सत्काराचे आयोजन…

लहानपणातील सवंगडी व राजकारणातील विश्वासू दिग्गज नेते व सच़्चे व इमानदार कार्यकर्त्यांचा भव्य नागरी कृतज्ञता सन्मान सत्कार सोहळ्याचे आयोजन….
बिदाल (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते शेतकऱ्यांचे भगीरथ नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांचा सातारा जिल्हा परिषद सदस्य व श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. अरुण दादासो गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिदाल जिल्हा परिषद गटातील लहानपणातील सवंगडी राजकारणातील विश्वासू दिग्गज नेते सच्चे व इनामदार कार्यकर्त्यांच्या आणि समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत भव्य नागरी कृतज्ञता सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन रविवार दि. 20 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 06 वाजता लोणार बाबा मंदिर, फुलेनगर, बिदाल येथे संपन्न होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महायुतीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात व राज्यात अनेक ठिकाणी नागरी सत्कार झाले मात्र, ज्या परिसरामध्ये आपण वाढलो, खेळलो, बागडलो असे अनेक प्रतिकूल परिस्थितीत जीवाला जीव देणारे कार्यकर्ते यांच्यावतीने मायभूमीत भूमिपुत्राचा सन्मान होत असल्याने या सत्कार सोहळ्याकडे सातारा जिल्हा व राज्याचे लक्ष लागून राहिलेले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.