ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांचा सोलापूर, सातारा, पुणे व मुंबई दौरा जाहीर…

माळशिरस (बारामती झटका)

ग्रामविकास व पंचायत राज, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, सोलापूर जिल्हा ना. जयकुमार कमल भगवानराव गोरे मंत्री, यांचा सोमवार, दि. २१, एप्रिल, २०२५ रोजीचा सोलापूर, सातारा, पुणे जिल्हा व मुंबई दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.

सोमवार, दि. २१.०४.२०२५ सकाळी ०८.४५ वा. ‘कमलकुंज’, निवासस्थान बोराटवाडी ता. माण येथून मोटारीने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण १०.३० वा. पंढरपूर येथे आगमन व पालखी तळांची पाहणी (संदर्भ – जिल्हाधिकारी, सोलापूर), दुपारी ११.१५ वा. पंढरपूर येथून पाटखळ, ता. मंगळवेढाकडे प्रयाण, ११.५० वा. पाटखळ, ता. मंगळवेढा येथे आगमन व श्री. सिद्धनाथ व जोगेश्वरी यात्रेनिमित्त अक्षदा सोहळा समारंभास उपस्थिती. (संदर्भ आमदार मा. श्री. समाधान आवताडे, १२.१५ वा. पाटखळ, ता. मंगळवेढा येथून पंढरपूरकडे प्रयाण, १२.५० वा. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथे आगमन व ०१.०० वा. आषाढी वारी सन २०२५ पूर्वतयारीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (संदर्भ – जिल्हाधिकारी, सोलापूर) (स्थळ – रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील, सभागृह, पंढरपूर) ०२.४५ वा. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण, ०२.५५ वा. शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव, ०३.३० वा. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक बांधणे, श्री संत चोखामेळा यांचे स्मारक बांधणे व श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी अरण तीर्थक्षेत्र विकास आराखडा बाबत आढावा बैठकीस उपस्थिती. (संदर्भ – जिल्हाधिकारी, सोलापूर), ०४.१५ वा. पंढरपूर शहरातील विविध विषयांबाबत आमदार मा. श्री. समाधान आवताडे, माजी आमदार, श्री. प्रशांत परिचारक व जिल्हाधिकारी सोलापूर यांचे समवेत चर्चा. (संदर्भ – जिल्हाधिकारी, सोलापूर), ०४.४५ वा. पंढरपूर येथून (झरे मार्गे) विरळी, ता. माण, जि. साताराकडे प्रयाण. सायं. ०६.०० वा. बागलवाडी, विरळी येथे आगमन व श्री. धुळोबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा व मंदिर कलशारोहन समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. प्रशांत गोरड,), ०६.३० वा. विरळी येथून वडूज ता. खटाव, जि. साताराकडे प्रयाण, ०७.१० वा. वडूज येथे आगमन व श्री. भैरवनाथ मंदिर येथे दर्शन (संदर्भ- श्री. श्रीकांत बनसोडे), ०७.२० वा. श्री. भैरवनाथ सांस्कृतिक भवन लोकार्पण सोहळा समारंभास उपस्थिती (संदर्भ- श्री. श्रीकांत बनसोडे), रात्री ०८.०० वा. वडूज, ता. खटाव येथून (सातारा – शिरवळ मार्ग) मुंबईकडे प्रयाण, ०२.०० वा. ‘प्रचीतीगड क-६’, शासकीय निवास्थान, मुंबई येथे आगमन व राखीव असा असणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button