डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त माळशिरस येथील पदवीधर मित्र परिवाराचा प्रेरणादायी उपक्रम

माळशिरस (बारामती झटका)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नगर, माळशिरस येथील पदवीधर मित्र परिवार यांचे वतीने शैक्षणिक व वैद्यकीय सहाय्याचे प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली, तसेच एका गरजवंत व्यक्तीस वैद्यकीय उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. विशेष म्हणजे, हा संपूर्ण उपक्रम समाजप्रेरित असून, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजांकडे लक्ष वेधणारा ठरला.
शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या विद्यार्थीनी म्हणून कु. निधी संतोष भोसले व माही कांबळे या विद्यार्थीनीची निवड करण्यात आली. तसेच अशोक धाईंजे यांना वैद्यकीय कारणासाठी म्हणून आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती पदवीधर मित्र परिवाराचे ॲड. सुमित सावंत यांनी दिली.

समाजातील विविध घटकांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत असून पदवीधर मित्र परिवाराने या पूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. सिद्धार्थनगर येथील पोलिस, वकिल, प्राध्यापक, नोकरदार लोकांचा या पदवीधरमित्र परिवारामध्ये समावेश आहे.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी नागेश धाईंजे, डॉ. विशाल ओव्हाळ, ॲड. सुमित सावंत, प्रतीकेश धाईंजे, प्रवीण नलावडे, दयानंद कांबळे, रोहित तिकुटे यांनी प्रयत्न केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.