पर्यावरण प्रेमी शिवाजी पठाडे यांची तरंगफळ येथे सदिच्छा भेट

तरंगफळ (बारामती झटका)
पर्यावरण प्रेमी आणि बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष मेजर शिवाजी पठाडे यांनी तरंगफळ, ता. माळशिरस येथे जलसंधारण पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी तरंगफळ परिसरात भेट दिली. शिवाजी पठाडे हे गेल्या अनेक दिवस वृक्ष लागवड व संवर्धन क्षेत्रात महाराष्ट्रभर अनेक उपक्रम राबवीत आहेत. अलीकडेच वाढते तापमान आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास याविषयी चिंता व्यक्त करून पर्यावरणात भरीव काम करणे गरजेचे आहे, अशी जनजागृती ते महाराष्ट्रभर करीत आहेत. त्यांचे बरोबर दादासो वाघमोडे उपस्थित होते.
यावेळी तरंगफळ ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य दिव्यांग नेते गोरख जानकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बीजउत्पादक संघाचे व्हाईस चेअरमन सुजित तरंगे, उपसरपंच माणिक बागाव, ग्रामपंचायत सदस्य विलास तरंगे, सतीश नरोटे, दादा कांबळे, नवनाथ कांबळे, संतोष कांबळे, अनिल तोरणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.