सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचा महाराष्ट्र चॅम्पियन विष्णू (अण्णा) गोरे यांनी सन्मान केला….

लाल मातीतील जीवाभावाच्या मित्रांचा जुन्या आठवणींना उजाळा..
कळंब (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा सन्मान महाराष्ट्र चॅम्पियन विष्णू (अण्णा) गोरे यांनी केला. यावेळी फडतरे उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उत्तम(दादा) फडतरे, जिजामाता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे वस्ताद गोविंद (तात्या) पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा ओबीसी उपाध्यक्ष सुनील गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बाबासाहेब पाटील उत्तम दादा) फडतरे विष्णू (अण्णा) गोरे गंगावेस तालीम कोल्हापूर येथे पाच वर्ष एकत्रित तालमीत राहिलेले होते. तालीम बंद करून अनेक वर्षे झाली तरीसुद्धा एकमेकांच्या संपर्कात आहेत. लाल मातीतील जीवाभावाच्या मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. महाराष्ट्र केसरी वेताळ उर्फ दादा शेळके यांना फडतरे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने 02 लाख 51 हजाराचा धनादेश उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
उद्योजक उत्तम (दादा) फडतरे यांनी भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन केलेले होते. सदरच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील, इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते व क्रीडामंत्री वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत बैलगाडी शर्यत संपन्न झालेली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.