“जैसी करणी वैसी भरणी”, रामराजे यांची अशी अवस्था, अनेकांचे नाहक ठसे पोलीस ठाण्यात दिले, स्वतःवर ठसे देण्याची दुर्दैवी वेळ आली.

ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांचे बदनामी प्रकरण वेगळ्या वळणावर, सुरुवातीच्या उगमाकडे वाटचाल…
फलटण (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे बदनामी प्रकरण वेगळ्या वळणावर चाललेले आहे. सुरुवातीला बदनामी गटात सहभागी असणाऱ्या उगमाकडे वाटचाल सुरू आहे. विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना पोलीस स्टेशन येथे हजर राहून स्वतःच्या हाताचे ठसे देण्याची दुर्दैवी वेळ आलेली असल्याने “जैसी करणी वैसी भरणी”, अशी अवस्था रामराजे यांची झालेली असल्याची चर्चा फलटणसह सातारा जिल्ह्यामध्ये रंगत आहे. चाळीस वर्षाच्या राजकारणामध्ये रामराजे व त्यांच्या सहकार्याने गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास देऊन बदनामी करून पोलीस स्टेशन येथे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून जाणीवपूर्वक त्रास दिलेला होता. रामराजे यांचे हाताचे ठसे पोलीस स्टेशन घेत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाल्यानंतर सर्वसामान्य गोरगरीब व पीडित जनतेला अंतर्मुख आनंद झालेला आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामी प्रकरणी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना वडूज पोलिसांनी समन्स जारी केले होते. त्यांना शनिवार दि. ३ मे रोजी सकाळी ११ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होऊन खळबळ माजलेली होती.
या प्रकरणात सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या तपासासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रभाकर घार्गे यांना वडूज पोलीस ठाण्याकडून समजपत्र देण्यात आले होते. घार्गे यांनाही दि. ३ रोजी वडूज पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे सूचित करण्यात आले होते.
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री ना. जयकुमार गोरे यांना खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार तुषार खरात, संबंधित महिला व शिवसेना शिंदे गटाचे सातारा उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांना दहिवडी पोलिसांनी अटक केली होती. या तिघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. खरात यांना अटक केल्यानंतर संबंधित महिलेलाही एक कोटी रुपयांची खंडणी घेताना सातारा पोलिसांनी अटक केली होती.
या गुन्ह्याचा तपास सातारा पोलिसांकडून वडूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्या अनुषंगाने वडूज पोलिसांनी न्यायालयात पत्रकार खरात, संबंधित महिला आणि अनिल सुभेदार यांच्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार सातारा जिल्हा न्यायालयाने या तिघांना वडूज पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेली होती. या प्रकरणात आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि प्रभाकर घार्गे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस वडूज पोलिसांनी पाठवली आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्या चौकशीसाठी पुणे येथील घरीदेखील पोलीस पथक काही दिवसांपूर्वी गेले होते. त्यामुळे या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.
रामराजे नाईक निंबाळकर यांचा पोलीस स्टेशन येथील फोटो पाहिल्यानंतर अनेक पिढीत व गोरगरीब जनतेमध्ये खुमासदार चर्चा सुरू आहे. अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून राजकारण केलेले होते, नाहक त्रास दिलेला होता. “जैसी करणी वैसी भरणी”, या वाक्याने फलटण व सातारा जिल्हा धुमसत आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.