शिवाजी तळेकर हे उत्तम प्रशासक व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक – आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड

३७ वर्षीय सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांनी केला सत्कार
माढा (बारामती झटका)
शिवाजी तळेकर हे एक उत्तम प्रशासक व विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून अविरतपणे कार्यरत राहिले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना त्यांनी विश्वासात घेऊन सर्वसमावेशक पद्धतीने शाळेचे कामकाज उत्कृष्ट पद्धतीने केले. त्यांनी गणित व भूमिती हे विषय अत्यंत सहजसोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविले. त्यांनी शाळेच्या निकालाची उज्ज्वल परंपरा राखण्यात सदोदित यश मिळविले. ते एक आदर्श पालक व कुटुंबप्रमुख आहेत, त्यामुळेच त्यांनी त्यांच्या एका मुलाला शिक्षक व एका मुलाला डॉक्टर करण्यासाठी उच्च शिक्षण दिले आहे. याकामी त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी जलवंती तळेकर यांची बहुमोल साथ लाभली आहे. त्यांचे उर्वरित आयुष्य निरोगी राहून त्यांच्या हातून समाजकार्य घडो अशी अपेक्षा विठ्ठलवाडीचे आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी व्यक्त केली आहे.
ते देवडी, ता. मोहोळ येथील महात्मा गांधी विद्यालयाचे गणित विषयाचे शिक्षक तथा उत्तम प्रशासक आदर्श मुख्याध्यापक शिवाजी नारायण तळेकर हे ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी तळेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी जलवंती तळेकर यांचा सत्कार विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व शांताबाई गुंड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व आजी-माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आला. सन १९९५ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी तळेकर यांना ३७ ग्रंथ व पुस्तके भेट म्हणून दिली.

यावेळी प्राथमिक शिक्षक रविकांत पेठे व सहशिक्षिका माधुरी गुंड, डॉ. ओंकार थोरात यांनीही सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना त्यांच्या शैक्षणिक व कौटुंबिक कार्याचे कौतुक केले.
सत्काराला उत्तर देताना सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी तळेकर यांनी सांगितले की, सेवानिवृत्त झाल्याबद्दल जो नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षक व मित्रमंडळी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी यथोचित सत्कार केला त्यामुळे मी अक्षरशः भारावून गेलो आहे. विद्यार्थ्यांनी नेहमी चांगल्याशी संगत करावी वाईटपासून कायम दूर रहावे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. जीवनात कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड, रामचंद्र घोंगाणे, प्राचार्य चंद्रकांत ढोले, बापूराव सरक, बाळासाहेब थोरात, व्यंकटेश थोरात, सज्जन थोरात, भिमराव गुंड, सत्यवान थोरात, दत्तात्रय थोरात, वेताळ तळेकर, दिलीप थोरात, नारायण खांडेकर, अरुण मोरे, हनुमंत उबाळे, रघुनाथ पासले, नागनाथ बरबडे, शिवाजी शिंदे, जोतिराम थोरात, शांताबाई गुंड, जलवंती तळेकर, वत्सला घोंगाणे, सुरेखा थोरात, वैशाली मेडसिंग-पाटील, राणी गुंड, उर्मिला पासले, मेघना गुंड, माधुरी गुंड, मिरा थोरात, मोनिका उबाळे, पद्मिनी शिंदे, शोभा बरबडे, वैशाली घोंगाणे, आरटीओ योगिता थोरात, स्वाती तळेकर, राजाभाऊ कदम, बबन उबाळे, तुकाराम कदम, प्रा. डॉ. नेताजी कोकाटे, डॉ. संतोष कदम, प्रा. नितीन कदम, डॉ. ओंकार थोरात, डॉ. समाधान थोरात, डॉ. सोहम तळेकर, दिपक तळेकर, रवींद्र घोंगाणे, सुधीर गुंड, शहाजहान मुलाणी, रविकांत पेठे, बाळासाहेब शेळके, रामचंद्र तिपे, आप्पासाहेब काकडे, दुर्गाकांत, शरद म्हमाणे,पोपट भोसले, चंद्रकांत पाटील, रामलिंग लोंढे, जगन्नाथ शेंडगे, नेताजी उबाळे, सुशेन भांगे, पांडुरंग खांडेकर, किशोर गुंड, सुहास शिंगाडे, समाधान कोकाटे, दिनेश गुंड, सज्जन मुळे, कैलास सस्ते, सुशेन मुळे, डॉ. राजवर्धन गुंड, शिवम गुंड, मेघश्री गुंड,समृद्धी गुंड यांच्यासह ग्रामस्थ, शिक्षक, नातेवाईक, मित्रमंडळी व आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



