ताज्या बातम्यासामाजिक

जेजुरी येथे डॉ. श्रद्धा जवंजाळ यांच्या शुभहस्ते भाजी कापण्याचे मशीन व ट्रे लोकार्पण सोहळा संपन्न

जेजुरी (बारामती झटका)

जेजुरी येथे श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी श्री म्हाळसा बानाई अन्नछत्र विभाग येथे सौ. मनीषा राजेंद्र खेडेकर यांच्याकडून भाजी कापण्याचे मशीन व ट्रे देण्यात आला. या याचा लोकार्पण सोहळा महिला व बालकल्याण विभाग च्या राष्ट्रीय सचिव डॉक्टर श्रद्धा राहुल जवंजाळ यांच्या शुभहस्ते रविवार दि. १५/६/२०२५ रोजी संपन्न झाला. तसेच यावेळी श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट व श्री मार्तंड देव संस्थान मंदिरासाठी २५,००० रुपयांची औषधे भेट देण्यात आली.

डॉ. श्रद्धा जवंजाळ यांचा सामाजिक उपक्रमात नेहमी पुढाकार असतो. रक्तदान शिबिर, पिंकेथॉन स्पर्धा, महिलांसाठी आरोग्य शिबिर, नृत्य शिबिर, सौंदर्य स्पर्धा अशा अनेक शिबिरांचे त्या आयोजन करतात. महिलांच्या आरोग्यासाठी त्या नेहमी सजग असून महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करतात. त्यांना विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

भाजी कापण्याचे मशीन व ट्रे लोकार्पण सोहळ्याचे निमंत्रक सौ. प्रियांका निकम, सौ. आदिती शिंदे, सौ. गौरी कणसे, सौ. रश्मी खैरनार, डॉ. दिपाली वाघ, सौ. वर्षा थोरवे, सौ. पल्लवी ढवळे, सौ. सुरेखा भेलके, डॉ. अपूर्वा क्षीरसागर, सौ. दिपाली खुडे, सौ. पुनम देवरे, सौ. निकिता मोरडे या होत्या.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom