ताज्या बातम्याशैक्षणिकसामाजिक

भाग्यश्री संजय शेंडे या कन्येने फोंडशिरस गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला…

ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व सौ. सोनिया गोरे यांनी भाग्यश्री संजय शेंडे हिच्या यशाचे कौतुक करून यथोचित सन्मान केला..

फोंडशिरस (बारामती झटका)

फोंडशिरस, ता. माळशिरस या गावची सुकन्या भाग्यश्री संजय शेंडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ARTO class 1 पदावर पोस्ट काढून फोंडशिरस गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला व शेंडे घराण्याचे नाव उज्वल केल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे व भाजपच्या प्रांतिक सदस्या तथा श्री सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी बोराटवाडी येथील कमलकुंज निवासस्थानी दैदीप्यमान यशाचे कौतुक करून यथोचित सन्मान केला. यावेळी फोंडशिरस गावचे विद्यमान व कर्तव्यदक्ष सरपंच पोपटराव बोराटे, अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष तथा फोंडशिरस ग्रामपंचायत सदस्य सुनील विष्णू गोरे, संजय शेंडे गुरुजी, शिवदास शेंडे, अतुल शेंडे आदी उपस्थित होते.

फोंडशिरस गावचे आदर्श शिक्षक संजय ज्ञानदेव शेंडे व उत्कृष्ट गृहिणी संगीता संजय शेंडे यांना भाग्यश्री व अभिनंदन अशी दोन मुले आहेत. अभिनंदन उत्तराखंड येथे इंजीनियरिंग च्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे.

भाग्यश्री हिचे पहिली ते चौथी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभार मळा फोंडशिरस येथे झालेले आहे. पाचवी ते दहावी शिक्षण श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस येथे झाले आहे. बीई मेकॅनिकल पदवी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कराड येथे पूर्ण केलेले आहे. पदवी पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पहिली पोस्ट सहाय्यक कक्ष अधिकारी मंत्रालय येथील काढलेली होती. त्यानंतर स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर दुसरी पोस्ट काढून STI म्हणून GST भवन मुंबई येथे कार्यरत होती. नोकरी करीत भाग्यश्रीचा अभ्यास करून पुढील प्रयत्न सुरू होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC – 2023 मधून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी ( ARTO) class 1 पदावर दैदीप्यमान यश संपादन केलेले असल्याने फोंडशिरस गावच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा रोवला व शेंडे घराण्याचे नाव उज्वल केलेले आहे.

भाग्यश्री हिच्या यशाचे फोंडशिरस पंचक्रोशीत कौतुक होत असतानाच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पालकमंत्री जयकुमार गोरे व धर्मपत्नी सौ. सोनिया जयकुमार गोरे यांनी भाग्यश्री हिचे कौतुक करून निवासस्थानी येथे यथोचित सन्मान केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom