राजरत्न नाईकनवरे मित्र परिवार व जिगरबाज ग्रुप श्रीपूर यांचे वतीने डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त सुपंत चषक स्पर्धेचे आयोजन

श्रीपूर (बारामती झटका)
सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक डॉ. यशवंतराव कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीपूर येथे ६ जुलै रोजी सुपंत चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजरत्न नाईकनवरे यांनी दिली आहे. स्पर्धेचे यंदाचे ५ वे वर्ष आहे. यासाठी भव्य व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. विजेत्या प्रथम संघास एक लाख रु., द्वितीय क्रमांक संघास पन्नास हजार रु., तृतीय क्रमांक विजेत्या संघास पंचवीस हजार रु., तर चतुर्थ विजेता संघास पंचवीस हजार रु. व सर्व विजेत्या संघास चषक भेट देण्यात येणार आहे. विजेत्या संघ मालकांस मोटारसायकल देण्यात येणार आहे.
सदर सामना सहा षटकांचा राहणार आहे. सामने लीग प्रमाणे खेळवले जाणार आहेत. सामने दोन हाफ गाव वाइज एक हाफ नगरपंचायत एक हाफ तालुका. आधारकार्ड बंधनकारक, प्रत्येक टिम मध्ये एक आयकॉन सुरवाती पासून राहिल, खेळाडूंच्या जिविताची हानी स्वतःवर राहिल, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंच असोशियशनचे राहतील, पन्नास टक्के प्रवेश फी जमा केल्याशिवाय संघ ग्राह्य मानला जाणार नाही, नाव नोंदणी अंतिम तारीख दोन जुलै, प्रथम चोवीस संघास प्राधान्य राहील, सर्व अधिकार समितीला अबाधित राहतील. या नियमांप्रमाणे स्पर्धा पार पडल्या जाणार आहेत. सदरचे सामने सकाळी नऊ वाजता सुरू होतील. सामना सुरू होण्यापूर्वी पंधरा मिनिटे अगोदर हजर रहावे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी पुढील नंबरवर संपर्क साधावा –
राजरत्न नाईकनवरे – 9890998886
आकाश गोदे – 9604604810
राजनंद नाईकनवरे – 9890307989
हरि आडगळे – 8637792782
अनिकेत भोसले – 9766372338
करण लांडगे – 9022208308
सदर सामने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे ट्रॅक्टर वहान तळावर होतील. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील संघांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन स्पर्धा यशस्वी करावी, असे संयोजकांनी आवाहन केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



