रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून नियमित रक्तदान करावे याचा फायदा होतो – कार्यकारी अभियंता सुनीता पाटील…

माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न….
अकलूज (बारामती झटका)
रक्तदान हेच श्रेष्ठ दान समजून नियमित रक्तदान केल्याने त्याचा आपल्या शरीरावर फायदाच होतो. रक्त अभिसरणाची क्रिया होते, त्यामुळे रक्त शुद्धीकरण होते आणि आपण रक्तदान केल्याने एखाद्या व्यक्तीचा जीव वाचतो. यासाठी तीन महिन्यानंतर वारंवार रक्तदान करावे, असा मौलिक सल्ला अकलूज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांनी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान संचलित ज्ञानसेतू अभ्यासिका व करिअर मार्गदर्शन केंद्र वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन ज्ञानसेतू अभ्यासिका अकलूज येथे उद्घाटन प्रसंगी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनी व रक्तदाते यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी गटविकास अधिकारी इंदापूर श्री. सचिन खुडे, अकलूज सार्वजनिक बांधकाम उपविभाग अकलूज उप अभियंता श्री. गोविंद कर्णवर पाटील, शाखा अभियंता श्री. सुरज ठवरे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. संभाजी वाघमोडे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. राजू हुलगे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. संदीप घुले आदी मान्यवरांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिरात डॉ. अमित शेटे, डॉ. नितीन साठे, डॉ. निखील आगम, डॉ. सारिका देवकाते – कर्णवर पाटील, डॉ. उमा जोशी यांनी सहकार्य केले.

सर्वप्रथम विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले. कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांनी 101 वेळा रक्तदान केलेले आहे. वयाच्या अठराव्या वर्षापासून रक्तदान करीत असल्याचे सांगून रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त तयार होते आणि आपल्या रक्तामुळे एखाद्याला अपघातात किंवा अन्य कारणाने रक्ताची गरज लागल्यास गरजवंतांना उपयोगी पडते. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. यामुळे ज्ञानसेतू मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी रक्तदान करावे, असा सल्ला कार्यकारी अभियंता सुनिता पाटील यांनी दिला. या रक्तदान शिबिरात अक्षय ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलित केले.
माळशिरस तालुक्यातील सर्व अधिकारी यांनी माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठान स्थापन करून समाजामधील गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानसेतू अभ्यासिका उपलब्ध केलेली आहे. सध्या ज्ञानसेतू अभ्यासिका व करियर मार्गदर्शन केंद्राच्या माळशिरस व अकलूज येथे दोन शाखा कार्यरत आहेत. वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले होते. माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा पोलीस निरीक्षक श्री. सोमनाथ कर्णवर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरच्या कार्यक्रमास माळशिरस तालुका अधिकारी प्रतिष्ठानचे वरिष्ठ अधिकारी यांनीही उपस्थित राहून सदिच्छा भेट दिलेल्या आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



