माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार यांची विठ्ठलराव पालवे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट…

पुरंदावडे (बारामती झटका)
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील बाळासाहेब चोपदार यांची पुरंदावडे गावचे प्रगतशील बागायतदार श्री. विठ्ठलराव पालवे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी ग्रामपंचायत हद्दीत आगमन झाल्यानंतर पहिला मुक्काम नातेपुते नगरपंचायत येथे असतो. नातेपुते वरून माऊलींचा पालखी सोहळा मांडवे गावच्या ओढ्यावर सकाळच्या न्याहरी करीता विसावा असतो. विसाव्यानंतर माऊलींचे सोलापूर जिल्ह्यात पहिले गोल रिंगण पुरंदावडे सदाशिवनगर या ठिकाणी संपन्न होत असते. माऊलींचा रिंगण सोहळा संपल्यानंतर बाळासाहेब चोपदार यांनी पालवे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

यावेळी बाळासाहेब चौधरी यांचा सन्मान प्रगतशील बागायतदार श्री. विठ्ठलराव पालवे पाटील, सासवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम विठ्ठलराव पालवे पाटील, हरिभाऊ विठ्ठलराव पालवे पाटील यांनी सन्मान केला. सासवड पोलीस स्टेशन हद्दीत माऊलींच्या पालखीच्या वेळी बंदोबस्तास असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पालवे यांनी बाळासाहेब चोपदार यांना रिंगण सोहळ्याच्या वेळी शेजारीच आमचे घर आहे. आपण यावे, असा आग्रह केलेला होता. त्याप्रमाणे बाळासाहेब चोपदार यांनी पालवे पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिलेली होती.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



