ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पत्राशेड व दर्शन रांगेची पाहणी

पालकमंत्री गोरे यांनी वारकरी भाविकांशी साधला संवाद…

पंढरपूर (बारामती झटका)

पंढरपूर आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळा कालावधीत राज्यातून तसेच परराज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून, दर्शनरांग गोपाळपूर पर्यंत गेली आहे. पददर्शन रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाच्या वतीने आवश्यक मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून, या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केली.

पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये, तसेच पददर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या उपायोजनांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधांची पाहणी केली. तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदीर समितीकडून पत्राशेड, दर्शनरांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी दर्शनरांगेतील भाविकांना मोफत अन्नदान सुरु केले असुन या अन्नदानाचे वाटपही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले. वारकरी भाविकांसाठी मंदीर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या.

त्याचबरोबर पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी टुव्हीलरवरुन दर्शनरांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली.

यावेळी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदीर प्रशासनाकडून पत्राशेड, दर्शनरांग, दर्शनमंडप, मंदीरात भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली. तसेच दर्शनरांगेतील भाविकांना सुलभ व जलद दर्शन व्हावे, यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सांगोला तहसिलदार संतोष कणसे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा प्रदेश सचिव माऊलीभाऊ हळणवर आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom