ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर

सोलापूर (बारामती झटका)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा शनिवार, दि. ०५ जुलै, २०२५ रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा जाहीर झाला आहे.

जाहीर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे –
वर्षा बंगल्यावरून सकाळी ११.३५ वा. मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज आं. विमानतळ, मुंबईकडे प्रयाण, दुपारी १२.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज आं. विमानतळ, मुंबई येथे आगमन, १२.०५ वा. विमानाने सोलापूरकडे प्रयाण, १२.५५ वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन, ०१.०० वा. हेलिकॉप्टरने पंढरपूर, जि. सोलापूरकडे प्रयाण, ०१.२० वा. जिल्हा मध्यवर्ती रोपवाटीका हेलिपॅड, ता. पंढरपूर येथे आगमन, ०१.२५वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण, ०१.३५ वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन, शा. विश्रामगृह, पंढरपुर, ०२.५० वा. मोटारीने कृषी उत्पन्न बाजार समिती मैदान, चंद्रभागा बस स्टैंड समोर, पंढरपूरकडे प्रयाण, ०२.५५ वा. श्री संत सावता माळी कृषीनगरी, कृषी उत्पन्न बाजार समिती आवार येथे आगमन, ०३.०० वा, कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन, ०३.४५ वा. मोटारीने पंचायत समिती, पंढरपूरकडे प्रयाण, ०३.५० वा. पंचायत समिती, पंढरपूर येथे आगमन, ०३.५० वा. ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या “निर्मल दिंडी” व मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या “चरण सेवा” उपक्रमाचा तसेच राज्य महिला आयोगाच्या आरोग्य वारी” चा समारोप समारंभ, सायंकाळी ०५.०० वा. मोटारीने इंटीग्रेटेड कंट्रोल रुम, शहर पोलीस स्टेशनच्या मागे, पंढरपूरकडे प्रयाण, ०५.०५ वा. इंटीग्रेटेड कंट्रोल रुम, शहर पोलीस स्टेशनच्या मागे, पंढरपूर येथे आगमन, ०५.०५ वा. सीसीटीव्ही कॅमेरा इंटीग्रेटेड कंट्रोल रुम व हरीत वारी अॅपचे उद्घाटन व इलेक्ट्रीक बसचे लोकार्पण, ०५.१५ वा. मोटारीने स्वा. सावरकर चौक, पंढरपूरकडे प्रयाण, ०५.२० वा. स्वा. सावरकर चौक, पंढरपूर येथे आगमन, ०५.२० वा. “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक भवन” चे भूमिपूजन, ०५.३५ वा. मोटारीने शासकीय विश्रामगृह, पंढरपूरकडे प्रयाण, ०५.४० वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन, शासकीय विश्रामगृह, पंढरपुर, ०५.४५ वा. “पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी” या पर्यावरण विषयक जनजागृतीपर उपक्रमाचा समारोप सोहळा, ०६.५० वा. शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने पंत नगर, पंढरपूरकडे प्रयाण, ०७.०० वा. पंत नगर, पंढरपूर येथे आगमन असा असणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom