पणन संचालक व जिल्हा निबंधक यांनी जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी….

सुंभ जळला तरी पीळ गेलेला नाही, सेवानिवृत्त सचिव राजेंद्र काकडे यांची बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे…
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांनी सचिव पदावर कार्यरत असताना बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केलेली आहे. कित्येक जणांना हंगामी कामावरून काढून टाकलेले आहे. कितीतरी कामगार कायम करण्यापासून वंचित ठेवलेले आहेत. मर्जीतील कामगारांना वर्षभरातच कायम करून टाकले आहे. अशा अनेक कृत्य करणाऱ्या सचिवाची सेवानिवृत्ती झालेली आहे. सुंभ जळाला तरी पीळ गेला नाही, अशी सेवानिवृत्त सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांची बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक सुरूच आहे. शुक्रवार दि 11/7/2025 रोजी स्वतःच्या मालकीची गाडी कर्मचाऱ्यांना बाजार समितीच्या आवारामध्ये धुण्यास लावलेली आहे. पणन संचालक पुणे व जिल्हा निबंधक यांना जनाची नाही मनाची तरी लाज बाळगावी, अशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी सभासद, व्यापारी व पीडित कर्मचारी त्यांच्यामधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन सचिव श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या प्रशासकीय कार्यकालातील केलेल्या कामांची चौकशी व त्यांची नियुक्ती व पदोन्नती अशा अनेक बाबींसह श्रीनिवास कदम पाटील यांनी तक्रार केली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने पणन संचालक यांनी जिल्हा निबंधक सोलापूर यांच्याकडे तक्रारी अर्ज पाठवलेला होता. जिल्हा निबंधक यांनी सहाय्यक निबंधक शिंदे यांच्याकडे तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिलेले होते. श्री. शिंदे यांनी मार्केट कमिटी मधीलच कर्मचाऱ्यांनी अहवाल तयार केल्यावर सही करून जिल्हा निबंधक यांच्याकडे पाठवला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर श्रीनिवास कदम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल व महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सदरच्या प्रकरणाविषयी आपण लक्ष घालून त्रिसमितीय सदस्य चौकशी करावी अशी विनंती केल्यानंतर पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी पणन मंत्री नामदार जयकुमार रावल यांना पत्र दिलेले आहे. व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सुद्धा सदरच्या प्रकरणाविषयी सखोल चौकशी करतो, अशी चर्चा झालेली होती
सदरच्या अनुषंगाने चौकशी होईल परंतु, खऱ्या अर्थाने मार्केट कमिटीवर वचक पणन संचालक व जिल्हा निबंधक यांचा असायला हवा मात्र, पणन संचालक व जिल्हा निबंधक यांना खरंच जनाची नाही मनाची लाज असेल तर या गोष्टीकडे गांभीर्याने पाहतील. सेवानिवृत्त सचिव बिनधास्तपणे कार्यालयात येतोच कसा, पदाधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये बसून कारभार सुरू असतो, अशी कुण कुण शेतकऱ्यांना लागलेली आहे. सचिव कार्यकालाच्या कालावधीत काळेबेरे केलेले दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे का ?, असा शेतकरी सभासद, व्यापारी व पीडित कर्मचारी यांच्यामधून सूर येत आहे.


खऱ्या अर्थाने सचिव श्री. राजेंद्र काकडे यांनी आपल्या पदाचा कसा गैरवापर केला हे चौकशीअंति समोर येणार आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा मार्गदर्शक यांचा खटाटोप सुरू आहे. मार्केट कमिटीचा भांडाफोड होऊ नये यासाठी वरिष्ठांच्या भेटीगाठी सुरू आहेत. परंतु, दोन जयकुमार निश्चितपणे अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समिती मोकळा श्वास घेईल, असा विश्वास तक्रारदार श्रीनिवास कदम पाटील यांनी व्यक्त केलेला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



