मारकडवाडी तालुका माळशिरस येथील 15 व्यक्तींवर ॲट्रॉसिटी व विनयभंगचा गुन्हा दाखल…

मारकडवाडी (बारामती झटका)
मारकडवाडी, ता. माळशिरस येथे मारकडवाडी ते कदमवाडी रोड लगत मातंग समाजातील धोंडीबा (आबा) दौलत सकट यांनी पंचर दुकानाकरता पत्र्याचे शेड मारल्याच्या कारणावरून गावातील लोकांनी मिळून येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करत, ये मांगट्यानो, तुमचं इथं काय काम आहे ?, आम्ही गावचे मालक आहोत, तुम्ही इथे शेड का मारले आहे. असे म्हणत मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून समाजातील लोकांना शिवीगाळ व मारहाण केली असल्याची तक्रार सौ. पूजा ऋषिकेश अवघडे, वय 31, रा. मारकडवाडी यांनी किशोर बाळू नेटके, गणेश बाळू नेटके संतोष रणदिवे, सचिन रणदिवे, अनिल अवघडे, धोंडीबा (आबा) दौलत सकट असे सर्व मिळून पोलीस स्टेशन येथे तक्रार दिलेली आहे.
सदरच्या तक्रारीवरून नातेपुते पोलीस स्टेशन येथे रणजीत जिजाबा मारकड, महादेव माणिक भाळे, शहाजी बाळू वाघमोडे, दत्तात्रय उत्तम मारकड, अनिल ब्रह्मदेव मारकड, शहाजी ब्रह्मदेव मारकड, अमोल बबन मारकड, बापू जिजाबा मारकड, शिवाजी आबा मारकड, बाबा अंकुश मारकड, आबाराजे दाजीराम मारकड, तानाजी अंकुश मारकड, शुभम राजेंद्र मारकड, अनिल मल्हारी भाळे, प्रताप अंकुश मारकड सर्व राहणार मारकडवाडी यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस) 2023 कलम 74 ,189 (2), 191(1), 190 , 115( 2) 352 अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(r),3(1)(s),3(1)(w)(i),3(2)(va) गुन्हा नोंद झालेला आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



