ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत निघणार…

आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, पहिल्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना दुसऱ्या दिवशी सरपंच पदाचे आरक्षण….

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्यातील दहाशे पंचवीस ग्रामपंचायत सरपंच पदाच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. माळशिरसचे तहसीलदार श्री. सुरेश शेजुळ यांना माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी विजया पांगारकर यांच्या नियंत्रणाखाली सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया पार पाडण्याचे पत्रान्वये कळविलेले आहे.

माळशिरस तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार आहे‌. त्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 24 पदांसाठी 12 महिला व 12 पुरुष, अनुसूचित जमातीसाठी 01 नागरिकांचा मागास प्रवर्ग 28 पदासाठी पुरुष 14 व स्त्री 14 तर सर्वसाधारण 50 जागांवर 25 महिला व 25 सर्वसाधारण असे आरक्षण माळशिरस पंचायत समितीचे सभागृह या ठिकाणी मंगळवार दि. 15/07/2025 रोजी दुपारी 12 वाजता आजी-माजी लोकप्रतिनिधी, तालुक्यातील आजी माजी सरपंच व सदस्य यांच्या उपस्थितीत सरपंच पदाचे आरक्षण सोडत संपन्न होणार आहे. यासाठी उपस्थित राहावे, असे तहसीलदार सुरेश शेजुळ, निवासी नायब तहसीलदार अमोल कदम यांच्याकडून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समिती यांच्या प्रभाग रचना अधिसूचना सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रभाग रचना अधिसूचना दि. 14/07/2025 रोजी जाहीर करणार आहेत. दि. 21/07/2025 रोजी पर्यंत हरकती होतील. दि. 18/08/2025 विभागीय आयुक्त हरकतीवर निर्णय घेतील. अंतिम प्रभाग रचना दि. 18/08/2025 रोजी जाहीर करतील.

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सदस्य होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती होण्यासाठी अनेकजण इच्छुक असतात. गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले असतात. अशावेळी प्रभाग रचना कशा पद्धतीने होत आहे व प्रभाग रचना झाल्यानंतर आरक्षण कशा पद्धतीने होईल, यावर खऱ्या अर्थाने जिल्हा व तालुका पुढाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. माळशिरस तालुक्यात 11 जिल्हा परिषद व 22 पंचायत समिती होत्या. परंतु, नातेपुते, अकलूज व महाळुंग या नव्याने नगरपरिषद व नगरपंचायत अस्तित्वात आल्याने माळशिरस तालुक्यात 09 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण होणार आहेत. गाव स्वरूपी सरपंच पद गावापुरते मर्यादित असते. यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचना महत्त्वाच्या असल्याने आधी लगीन कोंढाण्याचे मग रायबाचे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. पहिल्या दिवशी जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना तर दुसऱ्या दिवशी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्याने गाव गाड्यातील पुढारी सोमवार व मंगळवार या दिवसाकडे प्रभाग रचना व आरक्षण कसे पडते, याकडे टक लावून बसलेले आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom