ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यात 11 जिल्हा परिषद गट 22 पंचायत समिती फेरबदल 09 जिल्हा परिषद व 18 पंचायत समिती तालुका ढवळून निघाला…

नवीन गट व गण रचनेने भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अडचणीत, अनेकांचे अपेक्षाभंग होणार ?

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यात 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गण अस्तित्वात होते. मात्र, नातेपुते व महाळुंग नगरपंचायत व अकलूज नगर परिषदेमुळे माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद गट 11 वरून 09 वर तर पंचायत समिती गण 22 वरून 18 वर आलेले असल्याने माळशिरस तालुका ढवळून निघालेला आहे. नवीन गट व गण रचनेत भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अडचणीत असून अनेकांचा अपेक्षाभंग होणार, अशी गट व गण रचना निर्माण झालेली असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे..

महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असताना माळशिरस तालुक्यात गट व गण रचना करीत असताना तत्कालीन सत्ताधारी यांनी विरोधकांना कोंडी होईल, अशा पद्धतीने राजकीय व्यूहरचना तयार केलेली होती. तत्कालीन प्रस्थापित व विरोधक सध्या एकत्र आलेले आहेत. त्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झालेले आहे. महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य माळशिरस तालुक्यातील गट व गण रचना तयार होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील गट व गण रचना यामध्ये फेरबदल निश्चितपणे होणार आहे. पूर्वीच्या गट व गण रचनेमुळे अनेक जण भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य आहेत, अशा पद्धतीने तालुक्यामध्ये वावरत होते. अनेक कार्यक्रमांमधून जाणवत होते. सूत्रसंचालक भावी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य अशा प्रकारे नेत्यांची नावे घेत होती. मात्र गट व गण रचना पुन्हा तयार झालेली असल्याने अनेक राजकीय मातब्बर नेते मंडळींची कोंडी होणार अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom