ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस तालुक्यात 5 जिल्हा परिषद गट व 11 पंचायत समिती भाजपच्या ताब्यात अशी गट व गण रचना झाली…

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन शाहू फुले आंबेडकर विचारांचा वारसा जपणारे रणजीतदादा, जयाभाऊ, रामभाऊ या त्रिमूर्ती त्रिसूत्रीचा अवलंब करणार….

माळशिरस (बारामती झटका)

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन राजर्षी शाहू महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उर्फ रणजीतदादा, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते उर्फ रामभाऊ या त्रिमूर्ती त्रिसूत्रीचा अवलंब करून माळशिरस तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत रणनीती आखणार आहेत. गट व गणाचे आरक्षण कसेही असले तरी सध्याची माळशिरस तालुक्यात गट व गण रचना पाहिली असता प्रथम दर्शनीच माळशिरस तालुक्यात 05 जिल्हा परिषद व 11 पंचायत समिती गटांमध्ये त्रिमूर्तींची रणनीती यशस्वी होणार, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे..

महाराष्ट्रात भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी अजित दादा पवार अशी महायुती आहे तर काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी महाविकास आघाडी आहे. इतर पक्ष व संघटना वेगवेगळ्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती व महाविकास आघाडी एकत्र का विभक्त लढणार, अशी अजून राजकीय चर्चा नाही. मात्र, माळशिरस तालुक्यात भारतीय जनता पक्षासमवेत शिवसेना व राष्ट्रवादी पक्ष असो अथवा नसो लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या चित्रावरून भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुक्यात प्राबल्य जास्त आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे. सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्त फायदा होणार आहे. मोहिते पाटील व जानकर गट एकत्र लढले किंवा विभक्त लढले तरीसुद्धा माळशिरस तालुक्यात त्रिमूर्ती त्रिसूत्रींचा अवलंब करून निश्चितपणे माळशिरस तालुक्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळेल, अशी सध्या तरी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.

माळशिरस तालुक्यात 11 जिल्हा परिषद गट व 22 पंचायत समिती गण अस्तित्वात होते. नगरपरिषद व नगरपंचायत मुळे 09 जिल्हा परिषद गट व 18 पंचायत समिती गण अस्तित्वात आलेले आहेत.

37 जिल्हा परिषद दहिगाव गटात 73 गुरसाळे पंचायत समिती गणात गुरसाळे, शिंदेवाडी, देशमुखवाडी, डोंबाळवाडी (कु) हनुमानवाडी, तांबेवाडी, कुरबावी, एकशिव 74 दहिगाव पंचायत समिती गणात दहिगाव मोरोची कारंडे धर्मपुरी.

38 मांडवे जिल्हा परिषद गटात 75 मांडवे पंचायत समिती मांडवे, लोणंद, लोंढे मोहितेवाडी, फडतरी, निटवेवाडी, शिवारवस्ती पिंपरी कोथळे ७६ कण्हेर, पंचायत समिती गणात कण्हेर, रेडे, भांब, गिरवी, इस्लामपूर, जाधववाडी, जळभावी.

39 फोंडशिरस जिल्हा परिषद गटात 77 भांबुर्डी पंचायत समिती गणात भांबुर्डी, सदाशिवनगर, पुरंदावडे, तामशीदवाडी, मारकडवाडी, येळीव 78 फोंडशिरस पंचायत समिती गणात फोंडशिरस, मोटेवाडी (फों.) पिरळे, बांगर्डे, कळंबोली, पळसमंडळ, कदमवाडी.

40 संग्रामनगर जिल्हा परिषद गटात 79 मेडद पंचायत समिती गणात मेडद ,तिरवंडी, उंबरे दहिगाव, कचरेवाडी, प्रतापनगर, चाकोरे, कोंडबावी 80 संग्रामनगर पंचायत समिती गणात संग्रामनगर, आनंदनगर, बागेचीवाडी गिरझणी, विजयवाडी पानिव, घुलेनगर.

41 माळीनगर जिल्हा परिषद गटात 81 माळीनगर पंचायत समिती गणात माळीनगर, खंडाळी, दत्तनगर, सवतगव्हाण, बिजवडी 82 लवंग पंचायत समिती गणात लवंग, तांबवे, गणेशगाव, वाघोली, संगम, बाभूळगाव, वाफेगाव.

42 बोरगाव जिल्हा परिषद गटात 83 जांभूड पंचायत समिती गणात जांभूड, उंबरे वेळापूर, कोंढारपट्टा, नेवरे, विठ्ठलवाडी, खळवे, दसुर, तोंडले. 84 बोरगाव पंचायत समिती गणत बोरगाव, मिरे, माळखांबी, उघडेवाडी, बोंडले, धानोरे, शेंडेचिंच, माळेवाडी (बो.).

43 वेळापूर जिल्हा परिषद गटात 85 वेळापूर पंचायत समिती गणात वेळापूर, पिसेवाडी 86 यशवंतनगर पंचायत समिती गणात यशवंतनगर, चौंडेशरवाडी विझोरी.

44 निमगाव जिल्हा परिषद गटात 87 निमगाव पंचायत समिती गणात निमगाव, खुडूस, डोंबाळवाडी (खू.), झंजेवाडी कुसमोड. 88 गोरडवाडी पंचायत समिती गणात गोरडवाडी, मांडकी, मोटेवाडी (मा.), तरंगफळ, गारवाड, मगरवाडी, पठाणवस्ती चांदापुरी, झिंजेवस्ती.

45 पिलीव जिल्हा परिषद गटात 89 पिलीव पंचायत समिती गणात पिलीव, सुळेवाडी, बचेरी, शिंगोर्णी, कोळेगाव 90 तांदुळवाडी पंचायत समिती गणात तांदुळवाडी, मळोली, साळमुखवाडी, काळमवाडी, फळवणी.

अशी माळशिरस तालुक्यातील नवीन जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना तयार झालेली आहे. अजून आरक्षण बाकी आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom