कुरणेवाडी येथे पीक शेती शाळा संपन्न

बारामती (बारामती झटका)
कृषी विभागाच्यावतीने पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण प्रकल्पांतर्गत (क्रॉपसॅप) कुरणेवाडी येथे तानाजी बाळकृष्ण पवार यांच्या शेतात मका पीक शेती शाळा आयोजित करण्यात आली. यावेळी वडगाव निंबाळकरचे उप कृषी अधिकारी प्रताप कदम, सहाय्यक कृषी अधिकारी प्रवीण गायकवाड तसेच परिसरातील शेतकरी तसेच महिला उपस्थित होते.
यावेळी श्री.कदम म्हणाले, दिशा कृषी उन्नतीची या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून अधिकाधिक शेतकऱ्यांनी केळी पिकाची लागवड करावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, पीक विमा, ॲग्रीस्टॅकवर नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.
तसेच श्री. गायकवाड यांनी मका पिकाचे एकात्मिक पीक व्यवस्थापन तसेच जमीन आरोग्य पत्रिकेतील मार्गदर्शक सूचनांनुसार खताचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले. मका पिकाच्या वाढीसाठी माती परीक्षण करुन घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



