ताज्या बातम्याराजकारण

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार…

अकलूज (बारामती झटका)

माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी जीवात जीवमान असे तो जनसेवाच करू या ब्रीद वाक्याने महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेची स्थापना केलेली होती. सदर संघटनेची महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्याकडे जबाबदारी दिलेली होती. लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी जनसेवा संघटनेचे नाव महाराष्ट्रभर केलेले होते. जनसेवा संघटनेचे अनेक पदाधिकारी मंत्रिमंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध संस्थांवर सर्वोच्च पदावर पोहोचलेले होते. महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत.

लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील उर्फ पप्पासाहेब यांच्या पश्चात जनसेवा संघटनेची जबाबदारी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सोलापूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष युवा नेते डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्याकडे आलेली आहे.

डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषद गट अध्यक्ष व पंचायत समिती गण अध्यक्ष नगर परिषद व नगरपंचायत वार्ड अध्यक्ष व कार्यकर्त्यांना प्रशिक्षण शिबिर रविवार दि. 20/7/2025 रोजी सकाळी दहा ते एक वाजेपर्यंत प्रतापगड, धवलनगर येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे.

सदरचे शिबिर नवीन पदाधिकाऱ्यांना नवीन कौशल्य, नेतृत्व गुण, संघटनात्मक बांधणी आणि संघटना कार्याची प्रभावी माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. तसेच नूतन जिल्हा परिषद गट अध्यक्ष व पंचायत समिती गण अध्यक्ष वार्डाध्यक्ष यांचे नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम होणार आहे. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी सर्व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व प्रतापगडावर प्रेम करणाऱ्या सर्व नेते व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom