युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल सुळ महाराज, मोरोची यांचे नातेपुते येथे सुश्राव्य कीर्तन होणार…

युवा उद्योजक स्व. संतोष (आबा) रघुनाथ वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त कीर्तन, पुष्पवृष्टी महाप्रसादाचे आयोजन…
नातेपुते (बारामती झटका)
ज्ञान वैभव वारकरी शिक्षण संस्था मोरोची चे संस्थापक अध्यक्ष युवा कीर्तनकार ह. भ. प. अमोल सुळ महाराज मोरोची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन सोमवार दि. 28/07/2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेमध्ये नातेपुते नगरीचे युवा उद्योजक माणसातील देव माणूस स्वर्गीय संतोष आबा रघुनाथ वाघमोडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्त पिरळे रोड, काळे मळा, वाघमोडे वस्ती नातेपुते, ता. माळशिरस येथे प्रथम पुण्यस्मरण (वर्षश्राद्ध) निमित्त करण्यात आले आहे. यावेळी किर्तनानंतर पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे सौ. पारूबाई रघुनाथ वाघमोडे, श्री. रघुनाथ बापू वाघमोडे, सौ. आशा संजय वाघमोडे, श्री. संजय रघुनाथ वाघमोडे, श्रीमती जयश्री संतोष वाघमोडे, चि. पृथ्वीराज संतोष वाघमोडे, चि. विकी संजय वाघमोडे आणि समस्त वाघमोडे परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नातेपुते पंचक्रोशीत सर्वपरिचित सोज्वळ व संवेदनशील असे युवा उद्योजक म्हणून स्वर्गीय संतोष आबा यांची ओळख होती. असा दिलदार मनाचा माणूस गोरगरिबांना नेहमी सहकार्य करत असत. अनेकांच्या संसाराच्या सहकार्य करून घड्या बसवलेल्या होत्या. मात्र, स्वर्गीय आबांच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांच्या घराची घडी विस्कटली. आबांचा मृत्यू वाघमोडे परिवार यांनाच नाही तर नातेपुते पंचक्रोशीतील सर्व जाती धर्मातील लोकांच्या मनाला चटका लावून जाणारा होता. शेवटी ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही स्वर्गीय संतोष आबांना जेवढे आयुष्य मिळाले तेवढे वाघमोडे परिवार नातेवाईक व मित्रपरिवार यांच्या कायम स्मरणात राहील.
बघता बघता कधी वर्ष होत आले कळले नाही मात्र, परिवार व सहकार्य केलेल्या लोकांचा एक दिवस सुद्धा गेलेला नसेल त्यांना आबांची आठवण आलेली नाही.
स्वर्गीय संतोष आबा यांना त्यांच्या वागण्यातून व स्वभावातून ईश्वराने स्वतःजवळ स्थान दिलेले असेल. आबांच्या आत्म्याला शांती लाभावी व आबांनी पुनर्जन्म घ्यावा, अशी बारामती झटका परिवार यांचे कडून भावपूर्ण आदरांजली आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



