माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पदावर रघुनाथ पांढरे यांची नव्याने नियुक्ती….

माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार यांची वाळवा पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर बदली झाली. तर, वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांची माळशिरस पंचायत समिती गटविकास अधिकारी पदावर बदली आषाढी वारीच्या पूर्वी झालेली होती मात्र, डॉक्टर आबासाहेब पवार यांना आषाढी वारी व रघुनाथ पांढरे यांना जागतिक योग दिनाच्या दिवशी जागतिक विक्रम अशा दोघांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्याने आषाढी वारी नंतर डॉक्टर आबासाहेब पवार यांनी माळशिरस पंचायत समितीचा पदभार सोडला. रघुनाथ पवार यांनी ८ जुलै २०२५ पासून माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर नव्याने नियुक्त झालेले आहेत..
श्री. रघुनाथ भगवान पांढरे यांचे बारावी पर्यंतचे शिक्षण सदाशिवराव माने विद्यालय, अकलूज येथे झाले आहे. बीए इकॉनॉमिक्स ही पदवी शंकरराव मोहिते महाविद्यालय माळेवाडी, अकलूज येथे पूर्ण केली आहे. पुणे येथे एमए इकॉनॉमिक्स पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले आहे. शेतकरी कुटुंबातील व ग्रामीण भागातील पदव्युत्तर शिक्षणानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१२ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदावर उत्तीर्ण झालेले होते. २०१२ ते २०१८ पोलीस उपनिरीक्षक मुंबई येथे कार्यरत होते. २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन गटविकास अधिकारी श्रेणी १ मध्ये निवड झाली. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रोबेशन पिरेड योजना केली. २०२० साली मोखाडा पंचायत समिती जिल्हा पालघर येथे गटविकास अधिकारी पदावर काम केले. सन २०२२ ला मेहकर पंचायत समिती, जि. बुलढाणा येथे काम केले. नोव्हेंबर २०२४ पासून ८ जुलै २०२५ पर्यंत वाळवा पंचायत समिती, जि. सांगली येथे कार्यरत होते. ८ जुलै २०२५ पासून माळशिरस पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी पदावर नव्याने नियुक्त झालेले आहे.

श्री. रघुनाथ पांढरे यांना प्रशासनाचा दांडगा अनुभव असल्याने निश्चितपणे माळशिरस पंचायत समितीचा लोकाभिमुख कारभार करून जनता व प्रशासन यांचा चांगल्या पद्धतीने समन्वय ठेवतील. सध्या माळशिरस पंचायत समितीवर प्रशासक आहे. जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण प्रभाग रचना झालेली आहे.
लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊन पंचायत समितीला सभापती व उपसभापती नव्याने मिळतील. तोपर्यंत प्रशासक म्हणून श्री. रघुनाथ पांढरे यशस्वीपणे जबाबदारी पार पाडतील, असा विश्वास आज पर्यंत केलेल्या कार्यावरून वाटत आहे.

माळशिरस पंचायत समितीचे नव्याने रुजू झालेले कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी श्री. रघुनाथ पांढरे यांना बारामती झटका न्यूज संपादक श्रीनिवास कदम पाटील यांचे कडून शुभेच्छा आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



