अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव राजेंद्र काकडे यांची आयकर विभागामार्फत चौकशी करावी….

यशवंतनगर मध्ये 17 एकर जमीन, पाच गुंठ्यात तीन मजली बंगला, दोन चाकी, चार चाकी चॉईस नंबरच्या गाड्या, वेळापुरात अडीच एकर जमीन….
अकलूज (बारामती झटका)
अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सेवानिवृत्त सचिव राजेंद्र तुकाराम काकडे यांची आयकर विभागामार्फत चौकशी करावी, अशी श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मुख्य सचिव, आयकर आयुक्त, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सोलापूर आयकर अधिकारी सोलापूर यांच्याकडे तक्रार करून अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनियमितता करून व बेकायदेशीरपणे जमा केलेल्या संपत्तीची चौकशी करण्याकरता तक्रार करणार आहे.


अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजेंद्र तुकाराम काकडे यांची बाजार समितीत भरती, बढती व त्यांनी केलेल्या कामकाजाची प्रशासकीय चौकशी करण्याकरता पणन व राजशिष्टाचार मंत्री नामदार जयकुमार रावल व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांना निवेदन देऊन राजेंद्र काकडे यांच्या कार्यकालातील कामकाजाची त्रिसमितीय सदस्य नेमून चौकशी करावी, अशी मागणी केलेली होती. सध्या राजेंद्र काकडे सेवानिवृत्त झालेले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने राजेंद्र काकडे यांना पगारी तत्त्वावर घेण्यासाठी ठराव केलेला आहे. सदरचा प्रस्ताव पणन मंडळाकडून मंत्रालयात गेलेला असल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे मार्गदर्शक असणारे युवा नेते मंत्रालयांमध्ये राजकीय वजन वापरून सेवानिवृत्त सचिव राजेंद्र काकडे यांना अभय देऊन पुन्हा नियुक्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत..
राजेंद्र तुकाराम काकडे यांचे मूळ गाव घाडगेवाडी, ता. बारामती, जि. पुणे, येथे आहे. घाडगेवाडी येथे सुद्धा जमीन आहे. यशवंतनगर येथे खाते क्रमांक 10357 या व्यक्तिगत राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या खात्यावर 08 हेक्टर 68 आर इतकी जमीन आहे. त्यापैकी 7.78 अकृषीक तर 0. 93 आर कृषी जमीन गाव नमुना आठ अ धारण जमिनीची नोंदवही मध्ये आढळून आलेली आहे. खाते क्रमांक 12808 या सामायिक खात्यावर अकृषिक 01 हेक्टर 52 आर जमीन आहे. त्या सामायिक खात्यामध्ये राजेंद्र तुकाराम काकडे, उम्मे उमामा मोईन चौधरी, मोईन इम्तियाज चौधरी अशी तीन नावे आहेत.


यशवंतनगर मध्ये तीन मजली आलिशान इमारत आहे. चार चाकी गाडी व दोन चाकी मोटरसायकली चॉईस नंबरच्या गाड्या आहेत. वेळापुरात अडीच एकर राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या नावावर जमीन आहे. अजून किती ठिकाणी जमिनी, प्लॉट, वाहने आहेत, याची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या नावावर असणाऱ्या प्रॉपर्टीची माहिती कळवावी. तक्रारी अर्जामध्ये आयकर विभागांना देणे सोपे होईल. आयकर विभागाची चौकशी सुरू झाल्यानंतर पाळेमुळे हुडकून काढतीलच परंतु, तक्रारदार या नात्याने बरीचशी माहिती उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.
श्री. राजेंद्र तुकाराम काकडे यांच्या आई, वडील, भाऊ, भावजय, मुलगा, मुलगी यांच्या नावावर मूळ वडलार्जीत जमीन सोडून नवीन खरेदी केलेल्या जमिनी त्याचे मूल्यमापन केले जाणार आहे. राजेंद्र तुकाराम काकडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत क्लार्क पदावर सुरुवात केली होती. शेवट सचिव पदापर्यंत पदोन्नती कशी झाली, याचीही चौकशी सुरू आहे. यशवंतनगर येथे अकृषीक जमिनीचे बाजार भाव गगनाला भिडलेले आहेत. 2012 साली उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज, यशवंतनगर या कार्यालयासाठी 90 लाख रुपये एकराने कार्यालयाने जमीन घेतलेली आहे. यशवंतनगर मधील कृषीक व अकृषीक जमिनीची माहिती हाती आलेली आहे. अजून माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे, यासाठी ज्यांच्याकडे माहिती उपलब्ध असेल त्यांनी श्रीनिवास कदम पाटील मोबाईल नंबर 98 50 10 49 14 या नंबर वर संपर्क करावा. अथवा व्हाट्सअप वर माहिती पाठवावी, गोपनीयता ठेवली जाईल.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



