ताज्या बातम्यासामाजिक

मुलगा-नातींच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्यानं वडिलांनाही मृत्यूनं कवटाळलं

बारामतीत 24 तासात एकाच परिवारातील चौघांचा मृत्यू…

बारामती (बारामती झटका)

मालवाहू डंपरने दुचाकीला दिलेल्या धडकेत वडिलांसह दोन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी (दि. २७) बारामतीत घडली होती. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता.

काल (रविवारी, ता – 27) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला होता. या घटनेत आचार्य कुटुंबातील तिघांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही सोमवारी (ता. 28) निधन झाले. ते निवृत्त शिक्षक होते.

दोन नातींसह मुलाचा अपघाती मृत्यू
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी डंपरच्या चाकाखाली दुचाकी सापडल्याने तिघेही चेंगरले गेले. यात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताच्या घटनेत चार वर्षाची मधुरा ओंकार आचार्य व दहा वर्षाची सई ओंकार आचार्य या दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. ओंकार आचार्य असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकी चालकाचे नाव असून, तो मूळचा इंदापूर तालुक्यातील सणसर येथील रहिवासी असून सध्या बारामतीतील मोरगाव रोड येथे तो वास्तव्यास होता. या घटनेने संपूर्ण बारामती हळहळली. काल ओंकार आचार्य आणि त्यांच्या दोन मुलींचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आज ओंकारच्या वडिलांचे निधन झालं आहे. आचार्य यांच्या घरातील 24 तासाच्या आत 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गावात शोककळा पसरली
ओंकार आचार्य यांचे आणि त्यांच्या दोन मुलींचे अपघाती निधन झाल्यानंतर आज त्यांच्या वडिलांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे. राजेंद्र श्रीनिवास आचार्य असं त्यांचं नाव आहे. ते निवृत्त शिक्षक होते, त्यांचं वय देखील 70 वर्षांपेक्षा अधिक होतं, त्यांना ऑटिझम व शुगर होती, ते बारामतीतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, दोन दिवसांपूर्वी त्यांना घरी आणले होते. त्यांना फळे घेऊन येताना ओंकार आचार्य यांचा अपघात झाला होता. आज पहाटे त्यांचं देखील निधन झालं आहे.

जागेवर वडिलांचा तर उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू
शहरातील खंडोबा नगर येथील महात्मा फुले चौकात सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास वर्दळीच्या ठिकाणी डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये चाकाखाली दुचाकी (एमएच 16 सीए 0212) सापडल्याने तिघेही चिरडले गेले. यात दुचाकी चालकासह त्याच्या दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू झाला. ओंकार राजेंद्र आचार्य (मूळ रा. सणसर, ता. इंदापूर सध्या रा. मोरगावरोड, बारामती) यांसह सई (वय 10 वर्षे) आणि मधुरा (वय 4 वर्षे) अशी या तिघांची नावे आहेत. अपघातात ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या दोन्ही मुलींना उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या दोघींचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच कुटुंबातील तिघेही एकाच अपघातात गेल्याने संपूर्ण सणसर गावावर शोककळा पसरली आहे. तर आज पहाटे त्यांच्या वृध्द वडिलांचा देखील मृत्यू झाला. या घटनेनं आचार्य यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button
marsbahis hacklink market casibom