जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना मा. आ. राम सातपुते यांचे निरा देवधर पाणी संदर्भात निवेदन…

माळशिरस (बारामती झटका)
भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माळशिरस मतदारसंघातील नीरा-देवघर पाणी प्रश्नासंदर्भात आज निवेदन दिले. यावेळी त्यांच्याशी सविस्तर चर्चा करत माळशिरस तालुक्यातील शेतीसाठी पाणी नियोजन, बंधाऱ्यांची दुरुस्ती व पाणी प्रश्नावर तातडीने काम सुरू करण्याची मागणी केली. यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.


माळशिरस तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावे, शेती समृद्ध व्हावी आणि बंधारे सशक्त व्हावेत यासाठी, मी सातत्याने प्रयत्नशील आहे. माळशिरसच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून शेतकऱ्यांच्य हितासाठी लढत राहणार आहे, असे मत लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर आणि फलटण मतदारसंघाचे आमदार सचिनजी पाटील उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



